टी-20 मधील World Record; या संघाने 249 धावांनी मिळवला विजय!

टी-20 मधील World Record; या संघाने 249 धावांनी मिळवला विजय!

जागतिक क्रिकेटमध्ये टी-20 प्रकारात कोणत्याच स्तरावर एखाद्या संघाने इतका मोठा विजय मिळवला नसेल.

  • Share this:

काठमांडू, 05 डिसेंबर: नेपाळ (Nepal)मध्ये सुरु असलेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत (South Asian Games 2019) श्रीलंके (Sri Lanka)च्या संघाने विक्रमी असा विजय मिळवला. जागतिक क्रिकेटमध्ये टी-20 प्रकारात कोणत्याच स्तरावर एखाद्या संघाने इतका मोठा विजय मिळवला नसेल तितका या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाने मिळवला आहे. मालदीव विरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने तब्बल 249 धावांनी विजय मिळवला आहे. होय हा सामना टी-20 म्हणजे केवळ 20 षटकांचा होता. आता जर विजयच 249 धावांचा असेल तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की श्रीलंका संघाने 20 षटकात अशा किती धावा केल्या.

World Record: असा डेब्यू होणे नाही; एकही धाव न देत घेतल्या 6 विकेट!

नेपाळमधील पोखरा येथे झालेल्या सामन्यात मालदीव (Maldives)च्या महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेची सलामीची जोडी उमेशा आणि जनाडी यांनी अनुक्रमे 18 आणि 32 धावा केल्या. पण त्यानंतर आलेल्या हर्षिता मादावी (Harshita Madavi) आणि सात्या यांनी वादळी खेली केली. कर्णधार मादावीने 47 चेंडूत 106 धावा तर संदीपानीने 48 चेंडूत 96 धावांची वादळी खेळी केली. या दोघींनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे श्रीलंकेने 20 षटकात 279 धावांचा डोंगर उभा केला.

विजयासाठी विशाल लक्ष्य घेऊन मैदाना उतरलेल्या मालदीवचा संघ अवघ्या 30 धावात ऑलआऊट झाला. मालदीवकडून सजा फातिमाने सर्वाधिक 6 धावा केल्या. त्यांचे सलामीचे 3 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. संघाने 15 षटकात केवळ 30 धावा केल्या आणि श्रीलंके संघाने 249 धावांनी विजय मिळवला.

याच स्पर्धेत नेपाळच्या अंजली चंदने सोमवारी दक्षिण आशियन टी-20 स्पर्धेत एकही धाव न देता 6 विकेट घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एखाद्या गोलंदाजाकडून झालेली ही सर्वोत्तम अशी कामगिरी आहे.

स्पर्धेत भारताने संघ पाठवला नाही....

दक्षिण आशियाई स्पर्धेत चार संघांमध्ये क्रिकेट सामने सुरु आहेत. नेपाळ, श्रीलंका, मालदीव आणि बांगलादेश या देशांनी संघ पाठवले आहेत. तर भारत, पाकिस्तान आणि भूटान यांनी संघ पाठवले नाहीत. स्पर्धेत पहिल्या दिवशी नेपाळने मालदीवचा तर बांगलादेशने श्रीलंकेचा पराभव केला होता. पुरुषांच्या स्पर्धेत नेपाळने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला.

First published: December 5, 2019, 11:09 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading