• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • इंग्लंड टीमला मोठा धक्का, T20 वर्ल्ड कपनंतर Ashes सीरिजमधूनही महत्त्वाचा खेळाडू आऊट!

इंग्लंड टीमला मोठा धक्का, T20 वर्ल्ड कपनंतर Ashes सीरिजमधूनही महत्त्वाचा खेळाडू आऊट!

इंग्लंड क्रिकेट टीमसाठी (England Cricket Team) सर्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या अ‍ॅशेस सीरिजपूर्वी (Ashes 2021-22) टीमच्या अडचणीत भर पडली आहे.

 • Share this:
  मुंबई, 7 ऑक्टोबर: इंग्लंड क्रिकेट टीमसाठी (England Cricket Team) सर्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या अ‍ॅशेस सीरिजपूर्वी (Ashes 2021-22) टीमच्या अडचणीत भर पडली आहे. ऑस्ट्रेलियातील कडक क्वारंटाईनच्या नियमांमुळे या दौऱ्यावर बहिष्कार टाकण्याचा विचार इंग्लंडचे क्रिकेटपटू करत आहेत. त्यांना ख्रिसमसच्या काळात कुटुंबीयांपासून दूर राहणे मान्य नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांचे बोर्डामध्ये  चर्चा सुरू आहे. त्याचवेळी आणखी एका बातमीमुळे इंग्लंडच्या क्रिकेट टीमला धक्का बसला आहे. इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) याच्या बोटाची दुसऱ्यांदा सर्जरी झाली आहे. त्यामुळे स्टोक्स आगामी अ‍ॅशेस सीरिजमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. स्टोक्सला आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात (IPL 2021 Phase 1) बोटाला दुखापत झाली होती. त्यानंतर चार महिन्यांपूर्वी त्याच्या बोटावर सर्जरी करण्यात आली होती. 'द डेली मिरर' या ब्रिटीश वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार 'लीड्समधील डॉक्टर डग कँबेल यांनी स्टोक्सच्या बोटाची पहिली सर्जरी केली होती. त्यांनीच दुसऱ्यांदाही सर्जरी केली आहे. बोटाला झालेल्या दुखापतीपासून स्टोक्स क्रिकेटपासून दूर आहे. इंग्लंजच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याला पाकिस्तान विरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये खेळावं लागलं होतं. पाकिस्तानची पुन्हा फजिती! न्यूझीलंड, इंग्लंडनंतर आणखी एका देशाचा क्रिकेट दौरा रद्द पाकिस्तान दौऱ्यानंतर बेन स्टोक्सनं मानसिक कारणामुळे अनिश्चित कारणांसाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे स्टोक्स यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत खेळला नाही. तसंच आयपीएलनंतर लगेच होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठीही त्याची निवड करण्यात आलेली नाही. तो अ‍ॅशेस सीरिजमध्ये परतण्याची शक्यता कमी आहे. डेव्हिड वॉर्नरच्या खराब फॉर्मवर आली ऑस्ट्रेलियन कॅप्टनची प्रतिक्रिया, म्हणाला... बेन स्टोक्सवर पुनरागमन करण्यासाठी कोणताही दबाव टाकणार नसल्याचं इंग्लंडचे कोच सिल्वरवूड यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजला डिसेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे. न्यूझीलंड आणि भारताविरुद्ध मायदेशात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये  निराशाजनक कामगिरी केल्यानंतर इंग्लंडनं आगामी अ‍ॅशेस सीरिज जिंकणे आवश्यक आहे.
  Published by:News18 Desk
  First published: