Home /News /sport /

BBL: ऑस्ट्रेलियन बॉलरनं घेतली हॅट्ट्रिक, 4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेत रचला इतिहास, VIDEO

BBL: ऑस्ट्रेलियन बॉलरनं घेतली हॅट्ट्रिक, 4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेत रचला इतिहास, VIDEO

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धेत इतिहास घडला आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन बॉलरनं 4 बॉलवर 4 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला आहे.

    मुंबई, 19 जानेवारी : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धेत इतिहास घडला आहे. मेलबर्न रेनगेड्सकडून खेळणारा बॉलर कॅमेरून बॉयसनं  (Cameron Boyce) सिडनी थंडर्स विरुद्ध हॅट्ट्रिक घेतली. त्यानं 2 ओव्हरमध्ये रेकॉर्ड केला. विशेष म्हणजे त्यानं 4 बॉलवर 4 जणांना आऊट करत इतिहास घडवला आहे. बॉयसने सातव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर सर्वप्रथम अ‍ॅलेक्स हेल्सला आऊट केले. त्यानंतर नवव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर जेसन संघा, दुसऱ्या बॉलवर अ‍ॅलेक्स रॉस आणि तिसऱ्या बॉलवर डॅनियल सॅम्सला आऊट केले. बॉयसच्या घातक स्पेलमुळे सिडनी थंडरची अवस्था बिनबाद 80 वरून 4 आऊट 85 अशी झाली. बॉयसने ही कामगिरी करत इतिहास रचला आहे. तो बिग बॅश लीगमध्ये चार बॉलवर चार विकेट्स घेणारा पहिला बॉलर ठरला आहे. आजवर या लीगमध्ये एकाही बॉलरनं हा रेकॉर्ड केला नव्हता. तसेच टी20 क्रिकेटच्या इतिहासात ही कामगिरी करणारा तो 10 वा बॉलर आहे. बॉयस ऑस्ट्रेलियाकडून आजवर 7 टी20 इंटरनॅशनल खेळला आहे. त्यामध्ये त्याने 8 विकेट्स घेतल्या आहेत. तर 48 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 96, 48 लिस्ट A मॅचमध्ये 55 तर 87 टी20 मॅचमध्ये 92 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. IND vs IRE : टीम इंडियाला आज दुसऱ्या विजयाची संधी, कधी आणि कुठे पाहाल Live Streaming सिडनीची इनिंग सावरली ऑबॉयसने दिलेल्या या धक्क्यानंतरही सिडनी थंडर्सनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 170 रन केले. सिडनीचा कॅप्टन उस्मान ख्वाजानं 51 बॉलमध्ये 77 रनची खेळी केली. बॉयसने या इनिंगमध्ये 4 ओव्हर्समध्ये 21 रन देत 5 विकेट्स घेतल्या.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Australia, Cricket

    पुढील बातम्या