Home /News /sport /

मैं तो सुपरमैन! हवेत उडी मारून फिल्डरनं घेतला कॅच, खेळाडूही झाले हैराण; पाहा VIDEO

मैं तो सुपरमैन! हवेत उडी मारून फिल्डरनं घेतला कॅच, खेळाडूही झाले हैराण; पाहा VIDEO

असा जबरदस्त कॅच तुम्ही कधीच पाहिला नसेल. सुपरमॅन सारखा हवेत उडणाऱ्या फिल्डरचा पाहा VIDEO.

    सिडनी, 20 ऑगस्ट : कोरोनामुळे (Coronavirus) तब्बल 3-4 महिने सर्व क्रिकेट सामने रद्द झाले होते. आता पुन्हा क्रिकेट सामन्यांना सुरुवात झाली आहे. 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामालाही सुरुवात होणार आहे. मात्र सध्या खेळाडू हायलाट्स आणि जुने सामने पाहून आपले मनोरंजन करत आहेत. असाच एक व्हिडीओ ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने पोस्ट केला आहे. ऑस्ट्रेलियाने बिग बॅश लीगमधल्या (Big Bash League) सर्वात बेस्ट कॅचचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात फिल्डर जॉर्डन सिल्कनं सुपरमॅन सारखा हवेत उडत कॅच घेतला. सिल्कनं घेतलेला हा कॅच पाहून खेळाडूंनाही विश्वास बसला नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिल्कनं ब्रेट लीच्या गोलंदाजीवर हा कॅच घेतला. मात्र एक क्षण ब्रेट लीलाही खरं वाटलं नाही. वाचा-IPLमध्ये विजेत्या संघापेक्षा जास्त आहे मुंबई इंडियन्सच्या ‘या’ 7 खेळाडूंची कमाई! वाचा-हार्दिकच्या एका महिन्याच्या बाळाला गिफ्ट मिळाली 2 कोटींची मर्सिडीज? पाहा PHOTO हा व्हि़डीओ बिग बॅश लीगच्या तिसऱ्या हंगामातील आहे. 2014मध्ये हे हंगाम आयोजित करण्यात आले होते. सिडनी सिक्सर्स आणि ब्रिसबेन हीट्स यांच्यात झालेल्या सामन्यात हा कॅच घेण्यात आला. सिडनी सिक्सर्सकडून ब्रेट ली गोलंदाजी करत होता. त्यानं एक शानदार चेंडू टाकला, त्यावर क्रेग कीस्वेटरने समोर शॉट मारला. फलंदाजाला वाटत होते की हा चौकार असेल मात्र सिल्कनं हवेत डाइव्ह मारत शानदार कॅच घेतला.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या