मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

VIDEO: ऑस्ट्रेलियात आंद्रे रसेलचे वादळ, फक्त 6 बॉलमध्ये ठोकले 34 रन!

VIDEO: ऑस्ट्रेलियात आंद्रे रसेलचे वादळ, फक्त 6 बॉलमध्ये ठोकले 34 रन!

वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर आंद्रे रसेल (Andre Russell) क्रिकेट विश्वातील आक्रमक बॅटरपैकी एक आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेत (Big Bash League 2021-22) रसेलची बॅट चांगलीच तळपली.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13 डिसेंबर : वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर आंद्रे रसेल (Andre Russell) क्रिकेट विश्वातील आक्रमक बॅटरपैकी एक आहे. त्याची ही खासियत पाहून कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) आगामी आयपीएल सिझनसाठी त्याला रिटेन केले आहे. रसेल टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) फ्लॉप ठरला होता. पण, या वर्ल्ड कपनंतर तो पुन्हा एकदा फॉर्मात परतला आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेत (Big Bash League 2021-22) रविवारी रसेलची बॅट चांगलीच तळपली.

रसेल बिग बॅशमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळत आहे. रविवारी झालेल्या मॅचमध्ये (Sydney Thunder vs Melbourne Stars) त्याने 5 सिक्स आणि 1 फोरच्या मदतीने नाबाद 42 रन काढले. रसेलच्या या वादळी खेळामुळे मेलबर्न स्टार्सनं हा सामना 17 बॉल आणि 6 विकेट्स राखून जिंकला. रसेल 2017 नंतर पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळत आहे.

टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगला आलेल्या सिडनी थंडर्सची सुरूवात खराब झाली होती. त्यांनी पहिल्या 4 विकेट्स 65 रनमध्येच गमावल्या होत्या. त्यानंतर अ‍ॅलेक्स रोसनं 77 रनची खेळी केली. त्यामुळे सिडनीनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 आऊट 151 रन काढले. मेलबर्न स्टार्सकडून कैस अहमदनं 4 ओव्हर्समध्ये 17 रन देत 2 विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानी क्रिकेटपटू पत्रकारावर संतापला! सर्वांसमोर झाली तू-तू मैं-मैं, पाहा VIDEO

152 रनचा पाठला करताना मेलबर्न स्टार्सची अवस्था 4 आऊट 83 अशी झाली होती. त्यानंतर रसेलनं इनिंग सावरली. त्याने हिल्टन कार्टराइटसोबत अर्धशतकी भागिदारी केली. रसेलनं 21 बॉलमध्ये नाबाद 42 रन काढले. या खेळीत त्याने 5 सिक्स आणि 1 फोर लगावला. याचाच अर्थ रसेलने फक्त 6 बॉलमध्ये 34 रन काढले. रसेलच्या या खेळीमुळे स्टार्सनी 17 बॉल राखत विजय मिळवला. स्टार्सचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे.

First published:

Tags: Australia, Cricket news, KKR