'गंभीर, तू स्वत:ला मोठं करण्यासाठी दुसऱ्यांना कमी लेखू नको'

'गंभीर, तू स्वत:ला मोठं करण्यासाठी दुसऱ्यांना कमी लेखू नको'

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने केलेल्या टीकेनंतर उत्तर प्रदेशच्या माजी क्रीडा मंत्र्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 ऑगस्ट : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांच्यावर गौतम गंभीरने टीका करताना सैनीला दुय्यम वागणूक दिल्याचं म्हटलं होतं. त्यानतंर बेदी यांनी नवदीप सैनीबद्दल आपल्या मनात काहीच वाईट नाही. मात्र, गंभीरने केलेली टीका योग्य नाही असं म्हटलं आहे. तर माजी खासदार आणि क्रिकेटपटू चेतन चौहान यांनीलसुद्धा गंभीरवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलं की, स्वत:च्या कौतुकासाठी गंभीरने दुसऱ्यांना कमी लेखू नये.

बिशनसिंग बेदी यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, मला नाही वाटत की गंभीरप्रमाणे इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची गरज आहे. मी ट्विटरवरील त्याच्या टीकेला उत्तर देणार नाही. नवदीप सैनीबद्दल कधीच नकारात्मक बोललो नाही. याशिवाय एखाद्यानं काही मिळवलं असेल तर ती त्याची स्वत:ची प्रतिभा असते. ते कोणामुळं मिळालेलं नसतं असं म्हणत गंभीरवर अप्रत्यक्षपणे टीका केली.

अमेरिकेत सुरू असलेल्या विंडीजविरुद्धच्या मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण कऱणाऱ्या नवदीप सैनीने पहिल्याच सामन्यात तीन विकेट घेतल्या. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर 2 दिग्गज माजी क्रिकेटपटूंवर भडकला होता. गंभीरने दिग्गज फिरकीपटू बिशन सिंग बेदी आणि फलंदाजी चेतन चौहान यांना ट्विटरवरूनव सुनावलं होतं.

सैनीने पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात एका षटकात लागोपाठ दोन गडी बाद केले. त्याने निकोलस पूरन आणि शिम्रॉन हेटमायर यांना बाद करून विंडीजला डबल धक्का दिला. गेल्या तीन वर्षांपासून आयपीएल गाजवणाऱ्या सैनीने राष्ट्रीय संघात स्थान मिळण्यासाठी दावा केला होता.

गंभीरने ट्विटमध्ये लिहलं होतं की, भारताकडून पदार्पण करणाऱ्या सैनीचं अभिनंदन, त्यानं पहिला चेंडू टाकण्याआधीच बिशन बेदी आणि चेतन चौहान यांना बाद केलं होतं. ज्या खेळाडूनं मैदानावर पाऊल टाकण्याआधीच त्याचं क्रिकेट करिअर संपल्याचं म्हटलं होतं त्यानंच आता तुमची झोप उडवली. तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशा शब्दात गंभीरने ट्विट केलं होतं.

नवदीप सैनीच्या करिअरच्या सुरुवातीला गंभीरने मदत केली आहे. दिल्लीचा नसल्यानं त्याला खेळण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. तेव्हा दिल्ली क्रिकेटशी बोलून गंभीरने प्रयत्न केले होते. नवदीपने दिल्ली जिल्ही क्रिकेट संघाच्या कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता. तेव्हा त्याच्या बाजूने गंभीर उभा राहिला होता.

नवदीपने गंबीरचा विश्वास सार्थ ठरवत घरेलू क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्याची निवड 2017 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर नेट अभ्यासात खेळाडूंना गोलंदाजीसाठी करण्यासाठी झाली. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी निवड झाली होती.

इरफान पठाणसह 100 खेळाडूंना काश्मीर सोडण्याचे आदेश!

...जेव्हा मंत्रीच नागरिकांना पुरातून वाचवतात, पाहा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: August 4, 2019, 7:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading