भुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा

भुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा

अशा पद्धतीने चेंडू समोर येईल अशी अपेक्षा फिंचने केली नव्हती, त्यामुळे तो काही क्षणासाठी बिथरला.

  • Share this:

मेलबर्न, १८ जानेवारी २०१९- मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याची सुरुवात थोडी उशीराने झाली. खेळ सुरू झाल्यावर एलेक्स कॅरी आणि एरॉन फिंच मैदानात उतरले. मात्र पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या संघाला एलेक्स कॅरीमुळे पहिला धक्का बसला. यामुळे एरॉन फिंचवर आपसूक भुवनेश्वरचा दबाव दिसू लागला होता.

भुवीच्या शॉर्ट रनअपमुळे एरॉन आधीच वैतागला होता. नवव्या षटकांचा शेवटचा चेंडू फेकताना भुवीने पंचांच्या पुढे येण्याआधीच चेंडू फेकला. अशा पद्धतीने चेंडू समोर येईल अशी अपेक्षा फिंचने केली नव्हती, त्यामुळे तो काही क्षणासाठी बिथरला. पण तोवर भुवनेश्वरने तोवर चेंडू फेकला होता. हा चेंडू ऑफ स्टंपच्या लाइनकडे पडत ऑफ स्टंपच्या बाजूने निघून गेला.पंचांनी ‘डेड- बॉल’ म्हणून घोषित केलं. पण यादरम्यान ज्या पद्धतीने फिंच चेंडू न खेळता बाजूला झाला ते भुवीला पटलं नाही. तांत्रिकीरित्या गोलंदाजाला एवढ्या लांबून चेंडू फेकण्याची परवानगी असते. फिंचने स्वतःला उशीरा क्रिझपासून लांब केलं. नेमकी ही गोष्ट कर्णधार विराट कोहलीलाही पटली नाही. विराटने याबद्दल पंचांनाही सांगितलं, मात्र तरीही त्या चेंडूला डेडच ठेवण्यात आलं.या सगळ्या नाट्याचा फायदा टीम इंडियालाच झाला. या सगळ्यामुळे एरॉनचं लक्ष विचलीत झालं आणि भुवीच्या पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. पंचांनीही बोट उंचावत फिंच बाद असल्याचे सांगितले आणि एरॉनला तंबूचा रस्ता धरावा लागला.


VIDEO : भारताच्या ऐतिहासिक विजयावर विरुष्कानं असं केलं सेलिब्रेशन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2019 03:47 PM IST

ताज्या बातम्या