युवराजनंतर शाहरुखचा 'हा' सिक्सर किंग निवृत्त, कसोटीत केलंय सर्वात वेगवान शतक

युवराजनंतर शाहरुखचा 'हा' सिक्सर किंग निवृत्त, कसोटीत केलंय सर्वात वेगवान शतक

कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळलेल्या न्यूझीलंडच्या माजी कर्णधारानं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत यापुढे खेळणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

  • Share this:

ओटावा, 06 ऑगस्ट : भारताचा खेळाडू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अंबाती रायुडू आणि वेणुगोपाळ राव यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. याशिवाय लंकेचा लसिथ मलिंगा, आफ्रिकेचा हाशिम आमला, जे पी ड्युमिनी हेसुद्धा निवृत्त झाले. यामध्ये आणखी एका तडाखेबाज फलंदाजाच्या नावाचा समावेश झाला आहे.

न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेडॉन मॅक्युलमनं निवृत्ती घेतली असू त्याची माहिती ट्विटरवर दिली आहे. मॅक्युलम म्हणाला की, सध्या सुरू असलेली कॅनडा टी20 लीग संपल्यानंतर कोणत्याही प्रकारात खेळणार नाही. निवृत्ती जाहीर करताना समाधानी असून अभिमानसुद्धा आहे.

मॅक्युलमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2016 मध्येच 101 व्या कसोटीनंतर निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर वेगवेगळ्या देशांत तो टी20 लीगमध्ये खेळत होता. मॅक्युलमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडनं 2015 मध्ये वर्ल्ड कपची फायनल गाठली होती. मॅक्युलम म्हणाला की, गेल्या 20 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत जे काही मिळवलं ते स्वप्नवत होतं. मात्र आता थांबण्याची वेळ आली आहे.

मॅक्युलम टी20 क्रिकेटमध्ये ख्रिस गेलनंतर दुसरा यशस्वी फलंदाज आहे. गेलनं टी 20 मध्ये 12 हजार धावा केल्या आहेत. तर मॅक्युलमच्या 9 हजार 922 धावा झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कसोटीत 6 हजार 453, वनडेत 6 हजार 83 आणि टी20 मधअये 2 हजार 140 धावा झाल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक 107 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. तसेच कसोटीमध्ये सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम मॅक्युलमच्या नावावर आहे. त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2016 मध्ये 54 चेंडूत शतक केलं होतं.

मॅक्युलमनं आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडूनही तो खेळला आहे. केकेआरकडून खेळताना त्यानं 73 चेंडूत 158 धावांची वादळी खेळी केली होती.

IPL : शाहरूखला मोठा झटका, 'या' दोन मुख्य खेळाडूंनी सोडली KKRची साथ!

टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड सर्वांच्या सहमतीनं नाही, प्रशासकीय समितीनं केला 'हा' खुलासा!

जगज्जेत्यांना हे वागणं शोभत नाही, जेसन रॉयने बाद झाल्यानंतर केलं असभ्य वर्तन!

VIDEO: तो एक क्षण आणि थोडक्यात बचावले मुख्यमंत्री!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 02:27 PM IST

ताज्या बातम्या