Home /News /sport /

IND vs ENG: बेन स्टोक्स T20 वर्ल्ड कप खेळणार का? इंग्लंडच्या कोचनं दिलं मोठं अपडेट

IND vs ENG: बेन स्टोक्स T20 वर्ल्ड कप खेळणार का? इंग्लंडच्या कोचनं दिलं मोठं अपडेट

यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबरपासून टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) सुरू होत आहे. इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) हा वर्ल्ड कप खेळणार की नाही? याबाबत बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे.

    मुंबई, 8 सप्टेंबर : यूएई आणि ओमानमध्ये  17 ऑक्टोबरपासून टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) सुरू होत आहे. या वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर करण्याची डेडलाईन जवळ येत आहे. आत्तापर्यंत पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी टीम जाहीर केली आहे. टीम इंडियाची निवड प्रक्रिया देखील पूर्ण झाली असून आता घोषणा बाकी आहे. या वर्ल्ड कप विजेतेपदाचा प्रमुख दावेदार असलेल्या इंग्लंडसमोर मात्र एक डोकेदुखी निर्माण झाली आहे. इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) हा वर्ल्ड कप खेळणार की नाही? याबाबत बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. स्टोक्सनं सध्या मानसिक कारणामुळे क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. तो आयपीएल स्पर्धा देखील खेळणार नाही. आता T20 वर्ल्ड कप तो खेळणार का? याबाबत इंग्लंडचे मुख्य कोच ख्रिस सिल्वरवूड यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. बेन स्टोक्सवर पुनरागमन करण्यासाठी कोणताही दबाव टाकणार नसल्याचं सिल्वरवूड यांनी स्पष्ट केलंय. त्याचं हे विधान म्हणजे स्टोक्स आगामी वर्ल्ड कप खेळणार नाही, याचे संकेत असल्याचं मानलं जात आहे.  टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम निवडण्याची अंतिम तारिख ही 10 सप्टेंबर आहे. बेन स्टोक्सचा सध्या तरी क्रिकेटमध्ये परतण्याचा विचार नाही, अशी माहिती त्याच्या जवळच्या व्यक्तींनी दिल्याचं वृत्त ब्रिटीश वृत्तपत्रांनी दिलं होतं. या वर्ल्ड कपसाठी इंग्लंडच्या 15 सदस्यांची  घोषणा मँचेस्टरमध्ये होणाऱ्या पाचव्या टेस्टच्या एक दिवस आधी म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. IND vs ENG: टीम इंडिया अडचणीत! 2 प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीचं विराटला टेन्शन बेन स्टोक्सनं 30 जुलै रोजी भारत-इंग्लंड सीरिज सुरू होण्यापूर्वी क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याची घोषणा केली होती. इंग्लंड टीमनंही त्याला यामधून सावरण्यासाठी पूर्ण वेळ देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. स्टोक्सला सावरण्यासाठी जितका  वेळ हवा आहे, तितका दिला जाईल. असं सिल्वरवूड यांनी स्पष्ट केले आहे. इंग्लंडचा कॅप्टन जो रूट (Joe Root) यानेही  भारताची  टेस्ट सीरिज सूरू होण्यापूर्वी हेच सांगितलं होतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ben stokes, Cricket news

    पुढील बातम्या