न्यूझीलंडला स्टोक्सचं आवाहन, सोशल मीडियावरून दिला 'हा' संदेश!

केन विल्यम्सनसह बेन स्टोक्सचं न्यूझीलंड ऑफ द इयरसाठी नामांकन झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2019 08:28 AM IST

न्यूझीलंडला स्टोक्सचं आवाहन, सोशल मीडियावरून दिला 'हा' संदेश!

लंडन, 24 जुलै : ICC Cricket World Cup स्पर्धेत अंतिम सामन्यात बेन स्टोक्सनं सामनावीर पुरस्कार पटकावला होता. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रंगलेल्या सुपर ओव्हरच्या थरारात चौकार षटकारांच्या जोरावर यजमानांनी बाजी मारली. इंग्लंडच्या बेन स्टोक्सला न्यूझीलंडने 'न्यूझीलंड ऑफ द इयर' साठी नामांकन दिलं आहे. मात्र, स्टोक्सने त्याच्याऐवजी केन विल्यम्सनला हा पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.

बेन स्टोक्स आणि केन विल्यम्सनसह 10 खेळाडूंचे न्यूझीलंड ऑफ द इयरसाठी नामांकन झाले आहे. दरम्यान, स्टोक्सनं केन विल्यम्सन या पुरस्काराचा खरा मानकरी असल्याचं म्हटलं आहे. बेन स्टोक्स इंग्लंडसाठी खेळत असला तरी इथले लोक त्याला न्यूझीलंडचे मानतात असं न्यूझीलंड ऑफ द इयर पुरस्काराचे चीफ जज कॅमरॉन बेनट यांनी म्हटलं आहे. त्याच्याशिवाय 10 जणांचे नामांकन असून यामध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनचा समावेश आहे. डिसेंबर महिन्यात हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनं सोशल मीडियावर म्हटलं आहे की, न्यूझीलंड ऑफ द इयरसाठी नामांकन मिळाल्यानं आनंदी आहे. मला माझ्या मातृभूमीवर गर्व आहे पण या पुरस्कारासाठी मी योग्य नाही. माझ्याशिवाय अनेक लोक आहेत ज्यांनी न्यूझीलंडसाठी खूप काही केलं आहे. मी इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी मदत केली. सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्य करत आहे. जेव्हा मी 12 वर्षाचा होतो तेव्हापासून इथं राहत आहे. मला वाटतं की पूर्ण देशानं न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला पाठिंबा दिला पाहीजे. त्याला न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला पाहिजे. त्यानं वर्ल्ड कपमध्ये संघाचे नेतृत्व केलं.

केन विल्यम्सनबद्दल स्टोक्स म्हणाला की, विल्यम्सन वर्ल्ड कपमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. याशिवाय तो प्रेरणा देणारा कर्णधार आहे. परिस्थिती कशीही असली तरी त्याचा नम्र स्वभाव कायम राहिला. तो खूप चांगला माणूस आहे. न्यूझीलंडची खरी ओळख आहे. केन विल्यम्सनच या पुरस्काराचा खरा अधिकारी असून न्यूझीलंडच्या लोकांनी त्याला समर्थन द्यावं. माझंही मत त्यालाच जाईल.

इंग्लंडचा संपूर्ण संघ मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळत होता पण बेन स्टोक्स मात्र त्याच्या जन्मभूमीविरुद्धच लढला. स्टोक्सचा जन्म 4 जून 1991 मध्ये न्यूझीलंडमधील ख्राइस्टरचर्चमध्ये झाला.बेन स्टोक्सचे वडील रग्बी प्रशिक्षक होते. बेन ज्यावेळी 12 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडीलांची नियुक्ती इंग्लंडमध्ये वर्किंग्टन टाउन रग्बीच्या प्रशिक्षकपदी झाली. त्यावेळी त्यांना इंग्लंडला स्थलांतर करावे लागले. इंग्लंडला आल्यानंतर बेन स्टोक्सनं क्रिकेट शिकायला सुरुवात केली. स्टोक्स सध्या इंग्लंडमध्येच असला तरी त्याच्या आई वडिल 2013 पासून न्यूझीलंडमध्येच राहत आहेत.

Loading...

SPECIAL REPORT : मला काँग्रेसचा अध्यक्ष व्हायचंय, पुणेकर तरुणाचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 08:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...