Home /News /sport /

IPL 2022 : आयपीएल लिलावापूर्वी इंग्लंडचा खेळाडू फॉर्मात, 36 बॉलमध्ये झळकावले शतक

IPL 2022 : आयपीएल लिलावापूर्वी इंग्लंडचा खेळाडू फॉर्मात, 36 बॉलमध्ये झळकावले शतक

आयपीएल स्पर्धेच्या पुढील सिझनसाठी (IPL 2022) फेब्रुवारी महिन्यात मेगा ऑक्शन होणार आहे. या लिलावापूर्वी इंग्लंडच्या खेळाडूनं 36 बॉलमध्ये शतक झळकावत सर्व टीमचं लक्ष वेधलं आहे.

    मुंबई, 20 जानेवारी : आयपीएल स्पर्धेच्या पुढील सिझनसाठी (IPL 2022) फेब्रुवारी महिन्यात मेगा ऑक्शन होणार आहे. या आयपीएलमध्ये दोन नव्या टीम सहभागी होणार असून सर्व 10 टीमची रचना नव्याने होणार आहे. आता प्रत्यक्ष लिलावापूर्वी सर्वच टीमच्या मॅनेजमेंटचं जगभरातील स्पर्धांकडे लक्ष आहे. सध्या वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेला अंडर 19 वर्ल्ड कप, ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग आयपीएल टीमच्या रडारवर आहेत. त्याचबरोबर या दोन स्पर्धांमध्ये सहभागी नसलेले खेळाडू देखील दमदार कामगिरी करत आयपीएल टीमचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. इंग्लंडची टीम सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात इंग्लंड 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी झालेल्या प्रॅक्टीस मॅचमध्ये इंग्लंडचा ओपनर जेसन रॉयनं (Jason Roy) फक्त 36 बॉलमध्ये शतक झळकावलं आहे. रॉयने बार्बाडोस क्रिकेट असोसिएशन प्रेसिडेंट इलेव्हन विरुद्ध हे शतक झळकावले. त्याने टॉम बॅटनसोबत 141 रनची पार्टनरशिप केली. रॉयने 47 बॉलमध्ये 115 रन काढले. त्याच्या या दमदार खेळीमुलए इंग्लंडने 4 आऊट 231 रन केले होते. त्याला उत्तर देताना विरोधी टीम 137 रनवरच ऑल आऊट झाली. ICC Ranking : विराट कोहलीने कॅप्टनसी सोडताच टीम इंडियाला फटका दोन महिन्यांपूर्वी झालेल्या दुखापतीमुळे रॉयनं टी20 वर्ल्ड कपमधून माघार घेतली होती. त्यापूर्वी तो आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद टीमकडून खेळला होता. आगामी आयपीएल ऑक्शनपूर्वी सर्व फ्रँचायझीचे लक्ष वेधून घेण्यासाठी रॉयला वेस्ट इंडिज दौऱ्यात दमदार खेळ करावा लागेल. त्याने त्याची सुरूवात प्रॅक्टीस मॅचमध्येच केली आहे. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील टी20 मालिका 22 जानेवारी पासून सुरू होणार आहे. या  मालिकेत जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, जोस बटलर आणि बेन स्टोक्स यांना विश्रांती देण्यात आली आहे. हे सर्व जण अ‍ॅशेस सीरिजमध्ये खेळले होते. तर लियम लिविंग्स्टननं आजारपणामुळे माघार घेतली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: England, Ipl 2022, Ipl 2022 auction

    पुढील बातम्या