Home /News /sport /

विराट कोहलीची का झाली हकालपट्टी? भारतीय क्रिकेटचं भवितव्य ठरवणाऱ्या 48 तासांची Inside Story

विराट कोहलीची का झाली हकालपट्टी? भारतीय क्रिकेटचं भवितव्य ठरवणाऱ्या 48 तासांची Inside Story

रोहित शर्माची (Rohit Sharma) वन-डे टीमच्या कॅप्टनपदी नियुक्ती (Rohit Sharma replaces Virat Kohli as ODI captain) करण्यात आली. निवड समितीचा हा निर्णय सहज झाला नाही. या निर्णयासाठी तब्बल 48 तास पडद्यामागे याचे नाट्य रंगले.

    मुंबई, 9 डिसेंबर : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या (India vs South Africa) टीम इंडियाच्या टेस्ट टीमची घोषणा बुधवारी निवड समितीने केली. निवड समितीने बुधवारी आणखी एक मोठा निर्णय घेत रोहित शर्माची (Rohit Sharma)  वन-डे टीमच्या कॅप्टनपदी नियुक्ती (Rohit Sharma replaces Virat Kohli as ODI captain) करण्यात आली. निवड समितीचा हा निर्णय सहज झाला नाही. या निर्णयासाठी तब्बल 48 तास पडद्यामागे याचे नाट्य रंगले. निवड समितीने विराट कोहलीची (Virat Kohli) वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून हकालपट्टी केली, अशी माहिती आता समोर आली आहे. विराटने टी20 टीमची कॅप्टनसी स्वत:हून सोडली असली तरी वन-डे टीमच्या कॅप्टनपदी राहण्याचीत त्याची इच्छा होती.  विराट कोहलीला वन-डे टीमची कॅप्टनसी सोडण्यासाठी बीसीसीआयने 48 तासांची मुदत दिली होती. त्यानंतरही त्याने कॅप्टनसी सोडली नाही. त्यामुळे त्याची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. विराट कोहली वन-डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन होता. पण त्याच्या कॅप्टनसीमध्ये भारतीय क्रिकेट टीमला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017, वन-डे वर्ल्ड कप 2019 आणि टी20 वर्ल्ड कप 2021 या विराटच्या कॅप्टनसीमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये टीम इंडियाला विजेतेपदानं हुलकावणी दिली. यावर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये तर पहिल्याच फेरीत भारतीय टीमचे आव्हान संपुष्टात आले. टी20 वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर विराटची वन-डे टीमची कॅप्टनसी देखील जाणार हे नक्की झाले होते. बीसीसीआयनं माजी कॅप्टननं सन्मानजनक पद्धतीने पद सोडावे म्हणून त्याला 48 तासांची मुदत दिली होती. या कालावधीमध्येही विराटनं कॅप्टनसीचा राजीनामा दिला नाही, त्यामुळे त्याच्या हकालपट्टीचा निर्णय निवड समितीला घ्यावा लागला. रोहित शर्मासाठी डिसेंबर आहे लकी, या महिन्यात हमखास मिळते Good News रोहित शर्मासमोर आव्हान रोहित शर्मा आता टी20 आणि वन-डे टीमचा कॅप्टन झाला आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या वन-डे सीरिजपासून तो या प्रकारतील पूर्णवेळ कॅप्टन असेल. त्याच्यासमोर आगामी काळात अनेक खडतर आव्हान आहेत. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्ड कप होणार आहे. त्याचबरोबर 2023 साली भारतामध्ये वन-डे वर्ल्ड कप होत आहे. आयसीसीच्या या दोन स्पर्धांमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी होते? यावर रोहितच्या कॅप्टनसीचं भवितव्य अवलंबून असेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Rohit sharma, Virat kohli

    पुढील बातम्या