मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टीम इंडियासाठी पुन्हा येणार FAB 4 एकत्र, द्रविड-लक्ष्मणनंतर सचिनसाठी BCCI ची फिल्डिंग

टीम इंडियासाठी पुन्हा येणार FAB 4 एकत्र, द्रविड-लक्ष्मणनंतर सचिनसाठी BCCI ची फिल्डिंग

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सौरव गांगुली (Sourav Ganguly), राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) या चार दिग्गजांनी भारतीय क्रिकेट  एकत्र गाजवले आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 12 जानेवारी :  सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सौरव गांगुली (Sourav Ganguly), राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) या चार दिग्गजांनी भारतीय क्रिकेट एकत्र गाजवले आहे. क्रिकेट विश्वात फॅब 4 (Fab 4) म्हणून प्रसिद्ध असलेल्या या दिग्गजांपैकी तीन जण सध्या टीम इंडियासाठी पुन्हा काम करत आहेत. त्याचवेळी या सर्वांमधील ज्येष्ठ सचिनलाही टीम इंडियासोबत जोडण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे.

बीसीसीआय (BCCI) सचिव जय शहा (Jay Shah) हे सचिनच्या संपर्कात असून ते सचिनने भविष्यात भारतीय क्रिकेटमधील एखादी जबाबदारी घ्यावी, यासाठी प्रयत्न करत आहेत, असे वृत्त आहे. दोन दशकांहून जास्त काळ क्रिकेट खेळलेल्या सचिनच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. सर्वात महान खेळाडू म्हणून तो ओळखला जातो. सचिन निवृत्तीनंतर मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) मेंटॉर म्हणून सक्रीय आहे. त्याचवेळी भारतीय क्रिकेटच्या विकासासाठी त्याने मोठी भूमिका पार पाडावी यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे.

टीम इंडियाच्या हेड कोचपदी राहुल द्रविड तर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (NCA) संचालकपदी लक्ष्मण सध्या काम करत आहे. त्यांनी जबाबदारी घेतल्यापासूनच सचिनच्याही एन्ट्रीची फॅन्सना प्रतीक्षा आहे. सचिननं भारतीय क्रिकेटमध्ये आणखी योगदान द्यावं अशी इच्छा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यापूर्वी एका मुलाखतीमध्ये बोलून दाखवली आहे.

IND vs SA : 780 दिवसांनंतरही प्रतिक्षा कायम! थोडक्यासाठी हुकलं विराटचं शतक

'टाईम्स ऑफ इंडिया' च्या वृत्तानुसार जय शहा सध्या सचिनला नव्या जबाबदारीसाठी तयार करण्याचे प्रयत्न करत आहेत. द्रविड आणि लक्ष्मण यांचं मन वळवण्यातही त्यांची भूमिका निर्णायक होती. 'जय शहा मीडियाच्या रडारपासून दूर आहेत. पण काय करायचं आहे, याबाबत त्यांचे धोरण स्पष्ट आहे. लहान गोष्टी निर्णायक ठरतात. द्रविडला हेड कोच म्हणून नियुक्त करणे किंवा लक्ष्मणसारख्या दिग्गजानं एनसीएची जबाबदारी सांभाळणे हे याचे उदाहरण आहे. आमच्या माहितीनुसार सचिनने भविष्यात भारतीय क्रिकेटसाठी एखादी भूमिका पार पाडावी याबाबत ते प्रयत्न करत आहेत,' अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

First published:

Tags: BCCI, Cricket news, Rahul dravid, Sachin tendulkar