मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

128 वर्षांनतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार? BCCI नं दिलं 'हे' उत्तर

128 वर्षांनतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार? BCCI नं दिलं 'हे' उत्तर

टोकयोमध्ये नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारतानं आजवरची सर्वश्रेष्ठ कामगिरी केली आहे. त्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय खेळ असलेल्या क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करवा ही मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 ऑगस्ट : टोकयोमध्ये नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारतानं आजवरची सर्वश्रेष्ठ कामगिरी केली आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताला 1 गोल्ड मेडलसह 7 पदकं मिळाली. नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) भालाफेकीमध्ये (Men's javelin throw) गोल्ड मेडल जिंकत इतिहास रचला. त्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय खेळ असलेल्या क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करवा ही मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. यापूर्वी 1900 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर 2028 मध्ये लॉस एंजल्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत.

बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी याबाबत भारतीय क्रिकेट बोर्डाची भूमिका स्पष्ट केली आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला बीसीसीआयचा पूर्ण पाठिंबा आहे. या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाला तर भारतीय टीम त्यामध्ये नक्की सहभागी होईल. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाबाबत बीसीसीआय आणि आयसीसीमध्ये एकमत आहे.' असे शहा यांनी स्पष्ट केले.

इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननं (IOA) अतिरिक्त हस्तक्षेप केला नाही तर 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय टीमला पाठवण्यात येईल हे बीसीसीआनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.बीसीसीआयच्या सर्वोच्च कौन्सिलच्या एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीत यासाठी मान्यता देण्यात आली आहे. टोकोयो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथकाच्या मार्केटिंगसाठी बीसीसीआयनं यापूर्वी 10 कोटी रुपये दिले होते. तसंच टोकयो ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंनाही बक्षीस जाहीर केले आहे.

IND vs ENG : पहिल्या टेस्टनंतर विराट-अजिंक्यनं वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन!

बीसीसीआनं उघडली तिजोरी

भालाफेकमध्ये  गोल्ड मेडल पटकावणाऱ्या नीरज चोप्राला बीसीसीआय एक कोटी रुपये देणार आहे. सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या मीराबाई चानू (Mirabai Chanu) आणि पैलवान रवी दहिया (Ravi Dahiya) यांना प्रत्येकी 50-50 लाख रुपये मिळणार आहेत, तर पैलवान बजरंग पुनिया (Bajrang Punia), बॉक्सर लवलीना बोरगोहन (Lovlina Borgohain) आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) यांना प्रत्येकी 25-25 लाख रुपये मिळणार आहेत. भारताच्या पुरुष हॉकी टीमने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावलं, त्यांना 1.25 कोटी रुपये मिळणार आहेत.

First published:

Tags: BCCI, Cricket news, Olympics 2021