• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • कोरोनाचा BCCI ला आणखी एक फटका, क्रिकेटसाठी आयुष्य वेचणाऱ्या अधिकाऱ्याचं निधन

कोरोनाचा BCCI ला आणखी एक फटका, क्रिकेटसाठी आयुष्य वेचणाऱ्या अधिकाऱ्याचं निधन

कोरोना महामारीचा (Coroana pandemic) मोठा फटका भारतीय क्रिकेटला बसला आहे. गेल्या तीन दशकांपासून क्रिकेटची सेवा करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं कोरोनामुळे निधन झालं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 9 मे : कोरोना महामारीचा (Coroana pandemic) मोठा फटका भारतीय क्रिकेटला बसला आहे. या महामारीमुळे गेल्या वर्षापासून क्रिकेटचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. यावर्षी आयपीएल स्पर्धा (IPL 2021) देखील  यामुळे अचानक स्थगित करावी लागली. काही क्रिकेटपटूंनाही यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती.  विवेक यादव (Vivek Yadav) आणि किशन रुंगठा या दोन राजस्थानच्या खेळाडूंचं काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यातच भारतीय क्रिकेटसाठी आयुष्य वेचणारे BCCI चे अधिकारी कृष्णकुमार तिवारी (KK Tiwari) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 52 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. कोण होते तिवारी? तिवारी हे गेल्या तीन दशकांपासून दिल्ली क्रिकेटमध्ये स्कोरर (Scorer) होते. त्यांनी चार टेस्ट, पाच वन-डे आणि 60 रणजी मॅच कव्हर केल्या आहेत. त्याचबरोबर ते 50 आयपीएल मॅचचे देखील स्कोअरर होते. तसंच त्यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये 1985 सालापासून अंपायर म्हणून काम केलं आहे. दिल्ली क्रिकेटचा ज्ञानकोश (encyclopedia) म्हणून ते ओळखले जात.ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांनी ट्विट करुन त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. भारतीय खेळाडूच्या वडिलांचं कोरोनानं निधन, IPL गाजवल्यानंतर कोसळला दु:खाचा डोंगर तिवारी यांच्यावर झज्जरमधील एम्स हॉस्पिटलममध्ये उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती शनिवारी अचानक खालावली आणि त्यातच त्यांचं निधन झालं. दिल्ली क्रिकेट असोसिएशननं त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: