• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • पृथ्वी शॉ प्रकरणी BCCIचा खोटारडेपणा? बंदीपूर्वी संघ निवडीवरून प्रश्नचिन्ह

पृथ्वी शॉ प्रकरणी BCCIचा खोटारडेपणा? बंदीपूर्वी संघ निवडीवरून प्रश्नचिन्ह

पृथ्वी शॉवर बंदीची कारवाई 30 जुलैला झाली तर विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड 21 जुलैला झाली. बीसीसीआयनं कारवाईसाठी इतका वेळ का घेतला?

 • Share this:
  मुंबई, 09 ऑगस्ट : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉवर डोपिंगमध्ये दोषी आढळल्यानं बंदीची कारवाई करण्यात आली आहे. त्याला नोव्हेंबरपर्यंत खेळता येणार नाही. बीसीसीआयनं सांगितल्यानुसार शॉची चाचणी फेब्रुवारीत झाली होती. त्यानंतर 16 जुलैला तो दोषी आढळल्यानंतर 30 जुलैला शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, 21 जुलैला विराटच्या नेतृत्वाखाली विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. मात्र, यात पृथ्वी शॉला संधी मिळाली नाही. त्यानंतर पृथ्वीवर बंदी घातल्याचं समोर आलं. आता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, शॉच्या डोपिंगबद्दलची माहिती निवड समितीला होती का? टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या मुख्य फिजिओथेरपिस्टने संघाच्या निवडीपूर्वी बीसीसीआयला एक ईमेल पाठवला होता. यात म्हटलं होतं की, पृथ्वी शॉ दुखापतीतून सावरत आहे. मात्र, अजुनही खेळण्यासाठी फिट नाही. निवडीनंतर नऊ दिवसांनी जेव्हा भारतीय संघ वेस्ट इंडीजसाठी रवाना झाला तेव्हा बीसीसीआयनं शॉच्या डोपिंग टेस्टची माहिती दिली आणि त्याच्यावर 8 महिन्यांची बंदी घातली. बीसीसीआयला पृथ्वी शॉ 16 जुलै रोजी दोषी आढळल्याचं समजलं होतं. त्यानंतर 18 जुलै रोजी शॉनेसुद्धा मान्य केलं. त्यानंतर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की, बंदी घालण्यासाठी 30 जुलैपर्यंत वाट का बघितली? निवड समितीला याबाबत माहिती होती का? निवड समितीला पृथ्वीच्या बंदीची कुणकुण आधीच लागली होती. मात्र अधिकृतपणे त्यांच्याकडे याची माहिती देण्यात आली नव्हती म्हणजेच बीसीसीआय यामध्ये काहीतरी लपवत आहे. टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार, पृथ्वी शॉबद्दल निवड समितीला बीसीसीआय़नं अपडेट दिले होते. यात त्याच्याशिवाय आणखी 5 खेळाडूंची माहिती होती. हे पाहता बीसीसीआय़ काही लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं. बीसीसीआय़नं शिखर धवन फिट असल्याचं सांगितंल होतं. त्याशिवाय इशांत शर्मा, उमेश यादव, विजय शंकर, शार्दुल ठाकुरला दुखापत असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्याबद्दल बरीच माहिती देण्यात आली पण पृथ्वीची माहिती एका ओळीत होती. बंदीच्या कारवाईनंतर शॉनं म्हटलं होतं की, खोकल्यावर कफ सिरप वापरंल होतं. फिजिओथेरपिस्ट असताना भारतीय क्रिकेटपटू स्वत: जाऊन औषध खरेदी करणं पटत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शॉने स्वत: नाही तर दुसऱ्या कोणीतरी त्याला औषध दिलं होतं. विंडीज दौऱ्यातून डावललं, विक्रमी द्विशतक करून गंभीरला टाकलं मागे पावसाच्या खेळानंतर मैदानावर विराट-गेल यांचा डान्स, पाहा VIDEO ट्रोल झालेल्या सेल्फी VIDEOवर गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया
  Published by:Suraj Yadav
  First published: