भारताचा प्रशिक्षक कसा हवा? BCCI ने घातल्या 'या' अटी

भारताचा प्रशिक्षक कसा हवा? BCCI ने घातल्या 'या' अटी

भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार वेस्ट इंडीज दौऱ्यापर्यंत असून त्यानंतर प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जुलै : वर्ल्ड कपनंतर आता भारतीय संघात बदलाला सुरूवात करण्यात आली आहे. बीसीसीआयनं मंगळवारी मुख्य प्रशिक्षकांसह इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत त्यामध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, स्ट्रेंथ अॅण्ड कंडीशनिंग कोच, प्रशासकिय व्यवस्थापक या पदांचा समावेश आहे.

संघाची रणनिती ठरवणारा आणि संघबांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रशिक्षकासाठी त्यासारखी योग्यता हवी असं बीसीसीआयनं म्हटलं आहे. त्यासाठी बीसीसीआयने तीन महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. प्रमुख प्रशिक्षकाचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे तसेच किमान 2 वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असायला हवा.

मुख्य प्रशिक्षकाकडे कसोटी खेळणाऱ्या देशाला दोन वर्ष प्रशिक्षण दिल्याचा अनुभव असायला हवा किंवा असोसिएट सदस्य, ए टीम, आयपीएल टीम यापैकी एकाला कमीत कमी तीन वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव असायला हवा. भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी महत्त्वाची अट ही असणार आहे की, त्याने किमान 30 आंतरराष्ट्रीय कसोटी किंवा 50 एकदिवसीय खेळलेले असावे.

INDvsWI : विंडीजविरुद्ध लढणार नव्या दमाचे खेळाडू, ही नावे आघाडीवर!

अनिल कुंबळेच्या कारकिर्दीत भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा रवी शास्त्रींकडे सोपवण्यात आली. त्यावेळी प्रशिक्षक पदासाठी ठेवण्यात आलेल्या अटी स्पष्ट नव्हत्या. आता मुख्य प्रशिक्षकाशिवाय इतर तीन पदांसाठीसुद्धा अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यात कमीत कमी 10 कसोटी किंवा 25 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव असायला हवा.

ICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय!

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींचा करार वेस्ट इंडीज दौऱ्यापर्यंत आहे. तर सपोर्ट स्टाफमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचा करार संपणार आहे. या सर्वांचा करार वेस्ट इंडीज दौऱ्यापर्यंत वाढवण्यात आला आहे.

भाविकांच्या देणगीवर कोण मारतंय डल्ला, पाहा SPECIAL REPORT

First published: July 17, 2019, 9:35 AM IST

ताज्या बातम्या