Home /News /sport /

महिला क्रिकेटमधील वाद वाढला, कोच बदलण्याच्या निर्णयावर गांगुली नाराज!

महिला क्रिकेटमधील वाद वाढला, कोच बदलण्याच्या निर्णयावर गांगुली नाराज!

भारतीय महिला क्रिकेट टीमच्या कोचचा वाद आणखी वाढला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी रमन (WV Raman) यांना पदावरुन दूर केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

    मुंबई, 22 मे : भारतीय महिला क्रिकेट टीमच्या कोचचा वाद आणखी वाढला आहे. नव्या कोचच्या नियुक्तीसाठी नेमण्यात आलेल्या मदनलाल यांच्या क्रिकेट सल्लागार समितीनं (Cricket Advisory Committee)  WV रमन (WV Raman) यांच्या जागी रमेश पोवारची (Ramesh Powar) नियुक्ती केली होती. बीसीसीआयचे अध्यक्ष  सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी रमन यांना पदावरुन दूर करण्याबाबत पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. ज्या कोचच्या मार्गदर्शनाखाली टीम वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचली होती, त्यांना पदावरुन दूर करण्याबाबत गांगुली यांनी नाराजी व्यक्त केली आहे, असे वृत्त 'क्रिकबझ' ने दिले आहे. रमन यांना डिसेंबर 2018 मध्ये कोच म्हणून नियुक्त केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला टीमनं टी 20 वर्ल्ड कप 2020 च्या फायनलमध्ये धडक मारली होती. त्यावेळी त्यांना विजेतेपद पटकवण्यात अपयश आले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सीरिजमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. काही वरिष्ठ खेळाडूंनी रमन यांच्या बद्दल तक्रार केल्याची माहिती आहे. तरीही क्रिकेट सल्लागार समितीने रमन यांच्यावर विश्वास दाखवायला हवा होता, असे मत गांगुली यांनी व्यक्त केले आहे. दुसरिकडे क्रिकेट सल्लागार समितीच्या निर्णयाचा गांगुली यांनी आदर करायला हवा, असे मत महिला क्रिकेटशी संबंधित काही जणांनी व्यक्त केले आहे. क्रिकेट सल्लागार समिती एक स्वतंत्र संस्था आहे, हे या समितीचे यापूर्वी सदस्य राहिलेल्या गांगुलीला माहिती असायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. रमनने लिहिला होता ईमेल मावळते कोच WV रमन यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली  यांना ई मेल  लिहून महिला क्रिकेटमधील गर्विष्ठ संस्कृती नष्ट करण्याची मागणी केली होती. 'एखाद्या माजी खेळाडूचा श्वास या संस्कृतीमुळे कोंडला जात असेल तर त्यांनी (गांगुली) टीम इंडियाचा माजी कॅप्टन या नात्यानं या प्रकरणावर निर्णय घ्यायला हवा. कोचची ही मागणी जास्त आहे का?' असा सवाल रमन यांनी विचारला आहे. 45 वर्षांच्या बॅट्समननं काढले 190 रन, 15 सिक्स आणि 15 फोरचा केला वर्षाव रमन यांनी या पत्रात कोच म्हणून अधिक सक्रीय नसण्याचा आरोप देखील फेटाळला आहे. 'मागच्या वर्षी टी 20 लीगमध्ये संयुक्त अरब अमिरातमधील गरम वातावारणात दुपारी एक ते रात्री नऊ पर्यंत आपण तीन टीमला प्रशिक्षण दिलं होतं, याची आठवण रमन यांनी करुन दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Sourav ganguly

    पुढील बातम्या