मुंबई, 14 जून: टी 20 वर्ल्ड कपच्या (T 20 World Cup 2021) आयोजनाबाबत चर्चा करण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) मुंबईत दाखल झाले आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात हा वर्ल्ड कप भारतामध्ये प्रस्तावित आहे. मात्र कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) वर्ल्ड कप दुसऱ्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. गांगुलींच्या मुंबई दौऱ्यामध्ये याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. या विषयावर निर्णय करण्यासाठी आयसीसीनं (ICC) बीसीसीआयला 28 जूनपर्यंतची मुदत दिली आहे.
न्यूज एजन्सी ANI नं दिलेल्या वृत्तानुसार या वर्ल्ड कपच्या कर सवलतीसाठी बीसीसीआयला 15 जूनपर्यंत आयसीसीला माहिती द्यायची आहे. गांगुलींच्या मुंबई दौऱ्यात याबाबतही निर्णय होईल. सरकारनं कर सवलत दिली नाही तर बीसीसीआयला आयसीसीकडून मिळणाऱ्या महसुलात 900 कोटींची कपात होऊ शकते.
'हे' देश शर्यातीमध्ये
टी 20 वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी युएई आणि श्रीलंका या दोन देशांशी बीसीसीआयशी चर्चा सुरु आहे. युएईमध्ये दुबई, शारजा आणि अबूधाबी या तीन ठिकाणी हे सामने होऊ शकतात. तर श्रीलंकेत फक्त कोलंबोमध्ये तीन स्टेडियम आहेत. श्रीलंका बोर्डानं यापूर्वी आयपीएल आयोजनाचाही प्रस्ताव बीसीसीआयला दिला होता.
टीम इंडियाचा 'हा' खेळाडू ठरु शकतो न्यूझीलंडला भारी, वॉर्नरचं भाकीत
युएईमध्ये टी 20 वर्ल्ड कपपूर्वी आयपीएल स्पर्धा होणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कपच्या दरम्यान पिचची अवस्था तितकी चांगली नसेल. पिचच्या परिस्थितीचा विचार करुन श्रीलंका बोर्डशी चर्चा सुरु आहे. या वर्ल्ड कपचे आयोजन भारताबाहेर झाले तरी सर्व अधिकार हे बीसीसीआयकडेच असतील
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket news, Sourav ganguly