मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

हरभजनच्या निवृत्तीनंतर गांगुली भावुक, लाडक्या भज्जीबद्दल दादा म्हणाला...

हरभजनच्या निवृत्तीनंतर गांगुली भावुक, लाडक्या भज्जीबद्दल दादा म्हणाला...

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी हरभजन सिंगच्या (Harbhajan Singh) निवृत्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी हरभजन सिंगच्या (Harbhajan Singh) निवृत्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी हरभजन सिंगच्या (Harbhajan Singh) निवृत्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 25 डिसेंबर : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी हरभजन सिंगच्या (Harbhajan Singh) निवृत्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हरभजननं 23 वर्षांच्या कारकिर्दीनंतर शुक्रवारी निवृत्ती जाहीर केली. त्याने गांगुलीच्या कॅप्टनसीमध्ये सर्वात जास्त 37 टेस्ट खेळल्या. यामध्ये त्याने 177 विकेट्स घेतल्या. 'मी जेव्हा कुणीही नव्हतो, त्या काळात दादाने मला आधार दिला. आयुष्यात, कामामध्ये  योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता असते, माझ्या तीन व्यक्ती दादा होता,' अशी भावना हरभजनने व्यक्त केली आहे. सौरव गांगुली देखील हरभजनच्या निवृत्तीनंतर भावुक झाले होते. 'मी हरभजन सिंगचं जबरदस्त कारकिर्दीबद्दल अभिनंदन करतो. त्याने आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना केला. पण, भज्जी कधीही खचून जाणारा नाही. त्याने अनेक अडचणींवर मात केली. अनेक धक्के सहन करत तो पुन्हा उभा राहिला. चांगली कामगिरी करण्याच्या त्याच्या इच्छाशक्तीनं मला कायम प्रभावित केले. त्याची निडर वृत्ती हीच त्याची शक्ती होती. त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे,आणि तो कधीही आव्हानांना घाबरला नाही. तो ड्रेसिंग रूममधील वातावरण देखील आनंदी ठेवत असे, हे खूप महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2001 च्या सीरिजमधील त्याचा खेळ जबरदस्त होता. त्याने एकट्याच्या बॉलिंगच्या जोरावर ती सीरिज जिंकली. तो कॅप्टनचा आवडता होता. भज्जी चॅम्पियन खेळाडू आहे, त्याने जे मिळवलंय त्याचा अभिमान आहे. त्याची नवी इनिंग देखील तितकीच खास असेल.' अशी भावना गांगुलीनं व्यक्त केली. कोरोनाचा क्रिकेटला पुन्हा फटका, आणखी एक ODI रद्द बीसीसीआय सचिव जय शहा यांनीही हरभजनच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'हरभजनचे टीम इंडियातील करिअर जबरदस्त होते. तो देशात आणि विदेशातील अनेक संस्मरणीय विजयाचा घटक आहे. टीम दबावात असताना त्याने जिद्दीने खेळ करण्याची झुंजार वृत्ती ही नेहमीच खास होती.' असे शहा म्हणाले.
First published:

Tags: Cricket news, Harbhajan singh, Sourav ganguly

पुढील बातम्या