मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

राहुल द्रविड Team India चा कोच होणार का? सौरव गांगुलीनं दिलं मोठं अपडेट

राहुल द्रविड Team India चा कोच होणार का? सौरव गांगुलीनं दिलं मोठं अपडेट

टी20 वर्ल्ड कपनंतर (ICC T20 World Cup 2021) रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा टीम इंडियाचा हेड कोच म्हणून कार्यकाळ संपणार आहे. शास्त्री यांचा उत्तराधिकारी म्हणून माजी कॅप्टन राहुल द्रविडचं (Rahul Dravid) नाव सर्वात आघाडीवर आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 23 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपनंतर (ICC T20 World Cup 2021) रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा टीम इंडियाचा हेड कोच म्हणून कार्यकाळ संपणार आहे. शास्त्री यांचा उत्तराधिकारी म्हणून माजी कॅप्टन राहुल द्रविडचं (Rahul Dravid) नाव सर्वात आघाडीवर आहे. या सर्व विषयावर बीसीसीआयनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी एका कार्यक्रमात या विषयावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

'आजतक' या न्यूज चॅनलवरील खास कार्यक्रमात बोलताना गांगुली यांनी सांगितलं की, 'द्रविड टीम इंडियाचा हेड कोच होणार की नाही याबाबत अजून काहीही निश्चित झालेलं नाही. तो कोच होणार असल्याचं मी वृत्तपत्रांमध्ये वाचले. आम्ही कोच पदासाठी   जाहिरात दिली आहे. त्याची इच्छा असेल तर तो त्यासाठी अर्ज करु शकतो.'

गांगुलीनं द्रविडची भेट घेतली होती का?

सौरव गांगुली आणि बीसीसीआय सचिव जय शहा यांनी राहुल द्रविडचं हेड कोच होण्यासाठी मन वळवलं असल्याचं वृत्त प्रकाशित झालं होतं. टी20 वर्ल्ड कपनंतर लगेच द्रविड टीम इंडियाचा कोच होणार असल्याचं यामध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं. गांगुलीनं द्रविडशी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीबाबत (NCA) दुबईमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं. 'द्रविड सध्या एनसीएचा संचालक आहे. तो दुबईमध्ये या विषयावर चर्चा करण्यासाठी आला होता. नव्या क्रिकेटपटूंच्या जडणघडणीमध्ये एनसीएची भूमिका मोठी असते. द्रविड याच विषयावर चर्चा करण्यासाठी आला होता,' असे गांगुलीने स्पष्ट केले.

धोनीला मिळाला नवा रोल, पाकिस्तान विरुद्ध होणार टीम इंडियाचा फायदा! पाहा Photos

बीसीसीआयने टीम इंडियाच्या अनेक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये मुख्य प्रशिक्षक, बॅटिंग प्रशिक्षक, बॉलिंग प्रशिक्षक, फिल्डिंग प्रशिक्षक, एनसीएसाठी मुख्य प्रशिक्षक या पदांचा समावेश आहे. मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 26 ऑक्टोबर आहे, तर इतर पदांसाठी 3 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल.|

Team India चा प्रशिक्षक झाल्यानंतर राहुल द्रविडला मिळणार एवढं मानधन

टी-20 वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविड रवी शास्त्रींची मुख्य प्रशिक्षकाची जागा घ्यायची शक्यता आहे, तर बॉलिंग कोच म्हणून द्रविडचा विश्वासू असलेला पारस म्हाम्ब्रे काम पाहू शकतो. तर सध्या बॅटिंग कोच असलेले विक्रम राठोड या पदावर कायम राहू शकतात. सध्या भरत अरुण टीमचे बॉलिंग कोच आणि आर श्रीधर फिल्डिंग कोच आहेत.

First published:

Tags: Cricket news, Rahul dravid, Sourav ganguly