मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Sourav Ganguly Biopic : गांगुलीनं दिले मोठे अपडेट, क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी!

Sourav Ganguly Biopic : गांगुलीनं दिले मोठे अपडेट, क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी!

टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) क्रिकेट फॅन्सना एक आनंदाची बातमी दिली आहे. गांगुलीच्या क्रिकेट कारकिर्दीवर बायोपिक  (Sourav Ganguly Biopic) होणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 सप्टेंबर : टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) क्रिकेट फॅन्सना एक आनंदाची बातमी दिली आहे. गांगुलीच्या क्रिकेट कारकिर्दीवर बायोपिक  (Sourav Ganguly Biopic) होणार आहे. गांगुलीनं स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं यापूर्वी एका मुलाखतीमध्ये यापूर्वी एका मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली होती. आता त्याने ट्विट करत या विषयावर अधिकृत शिक्कामोर्तब केलं आहे.

बायोपिकच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समजलेली नाही. पण 'लव फिल्म्स' कडून या चित्रपटाची निर्मिती केली जाणार असल्याचं गांगुली यांनी सांगितलं आहे लव रंजन हे या सिनेमाचे दिग्दर्शक असण्याची शक्यता आहे. गांगुलीच्यापूर्वी महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर, अझहरुद्दीन, मिल्खा सिंह, सायना नेहवाल, मेरी कोम या खेळाडूंच्या आयुष्यावरील चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आता या यादीमध्ये पुढील बायोपिक गांगुलीचा असेल. या सिनेमात गांगुलीची भूमिका कोण करेल हे अद्याप जाहीर झालेलं नाही. पण गांगुलीनं स्वत: एका मुलाखतीमध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यासाठी योग्य असल्याचं सांगितलं होतं.

सौरव गांगुलीनं ट्विट करत म्हंटलं आहे की, 'क्रिकेट हेच माझं आयुष्य आहे. त्यामुळेच मला आत्मविश्वास मिळाला. ताठ मानेनं जगता आलं. या प्रवासाला जिवंत करण्यात येणार आहे. त्याची मला उत्सुकता आहे. लव फिल्म्स माझी ही यात्रा एका बयोपिकच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर सादर करणार आहे.'

लव रंजन यांनीही ट्विट करत गांगुलीला उत्तर दिलं आहे. 'दादा, लव फिल्म्स परिवाराचा सदस्य होणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्हाला तुझ्या आयुष्याचा भाग केल्याबद्दल आणि ते आयुष्य पडद्यावर मांडण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.'

IND vs ENG: 'हा' मुंबईकर करणार मँचेस्टर टेस्टमध्ये पदार्पण, पाहा संभाव्य Playing 11

गांगुलीची कारकिर्द

सौरव गांगुलीनं 113 टेस्टमध्ये 7,212 रन केले. तर 311 वन-डेमध्ये 11,363 रन काढले. टीम इंडियाच्या यशस्वी कॅप्टनमध्ये त्याचा समावेश होतो. गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय टीमनं 2003 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेत फायनलपर्यंत धडक मारली होती.

First published:

Tags: Sourav ganguly