मुंबई, 23 मे: आयपीएल 2021 (IPL 2021) मधील उर्वरित 31 सामने कधी आणि कुठे होणार? हा सध्या भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात चर्चेत असणारा प्रश्न आहे. उर्वरित स्पर्धा भारतामध्ये होणार नाही, हे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. बीसीआयसमोर इंग्लंड, युएई आणि श्रीलंका हे तीन प्रस्ताव आहेत. बीसीसीआयची विशेष बैठक 29 मे रोजी होणार असून या बैठकीमध्ये उर्वरित 31 मॅचबाबत निर्णय होणार आहे.
या विषयावरील एका रिपोर्टनुसार इंग्लंड दौरा समाप्त झाल्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) आयपीएलच्या उर्वरित मॅच होणार आहेत. भारताच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात 18 जूनपासून सुरु होणार आहे. टीम इंडिया सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळेल. त्यानंतर इंग्लंड विरुद्धची पाच टेस्टची मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होईल.
बीसीसआयनं अजून इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) कोणतीही विनंती केलेली नाही. मात्र बीसीसीआय दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टमधील नऊ दिवसांचे अंतर कमी करुन चार दिवस करावे अशी विनंती इसीबीला करु शकते, अशी माहिती 'टाईम्स ऑफ इंडिया' ने दिली आहे. हे अंतर कमी झाल्यास बीसीसीआयला आयपीएल स्पर्धेच्या आयोजनासाठी अधिक वेळ मिळेल.
30 दिवसांमध्ये होणार स्पर्धा
टाईम्स ऑफ इंडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार "दोन टेस्टमधील अंतर कमी केले नाही तर 30 दिवसांमधील एक दिवस भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना युएईमध्ये आणण्यासाठी जाईल. नॉकआऊट राऊंडसाठी पाच दिवस लागतील. त्या परिस्थितीमध्ये बीसीसीआयकडे उर्वरित 27 सामने खेळवण्यासाठी 24 दिवस असतील. या कालावधीमध्ये आठ दिवस शनिवार-रविवार आहेत. त्या दिवशी रोज दोन अशा 16 मॅच होतील. त्यानंतर उर्वरित दिवसांमध्ये 11 मॅच होऊ शकतात.
शाहिद आफ्रिदीचं लग्नावर शिक्कामोर्तब, 20 वर्षांचा पाकिस्तानी बॉलर होणार जावई
टी20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी आयपीएल स्पर्धा ही चांगली संधी आहे, अशी बीसीसीआयला आशा आहे. भारतामध्ये यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात टी 20 वर्ल्ड कप नियोजित आहे. भारतामधी कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हा वर्ल्ड कप युएईमध्ये होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.