• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : 'या' महिन्यात होणार आयपीएलचे उर्वरित सामने, BCCI चे संकेत

IPL 2021 : 'या' महिन्यात होणार आयपीएलचे उर्वरित सामने, BCCI चे संकेत

बीसीसीआयनं (BCCI) तयार केलेल्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा (Covid-19) उद्रेक झाल्यानं आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) अचानक स्थगित करावा लागला.

 • Share this:
  मुंबई, 9 मे : बीसीसीआयनं (BCCI) तयार केलेल्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा (Covid-19) उद्रेक झाल्यानं आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) अचानक स्थगित करावा लागला. आयपीएलमधील स्पर्धेतील 60 पैकी 31 सामने अजून बाकी आहेत. हे सर्व सामने कधी आणि कुठं घ्यायचे यावर सध्या विचार चालू आहे. त्याचवेळी ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याचे संकेत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिली आहे. भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात टी20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी सर्व विदेशी टीम सप्टेंबर महिन्यात भारतामध्ये असतील. त्यामुळे आयपीएल सामन्यांसाठी सप्टेंबर महिन्याची विंडो मिळाली तर स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं ANI या वृत्तसंस्थेची बोलताना ही माहिती दिली आहे. " विदेशी खेळाडू उपलब्ध असतील आणि कोव्हिड 19 ची परिस्थिती नियंत्रणात असेल तर आम्ही टी20 वर्ल्डपच्या पूर्वी या स्पर्धेचा विचार करु. टी 20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी याचा चांगला उपयोग होईल," असं या अधिकाऱ्यानं सांगितलं. गांगुली - जय शहा करणार दौरा बीसीसीआयकडे आयपीएलसाठी युएई (UAE) आणि इंग्लंड (England) या दोन देशांचे पर्याय आहेत. इंग्लंडमधल्या 4 काऊंटी क्लबने तर आधीच बीसीसीआयला आयपीएलच्या आयोजनाबाबत ऑफर दिली आहे. यानंतर आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह (Jay Shah) इंग्लंडला जाणार आहेत. 18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळवली जाणार आहे. इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये हा सामना खेळवला जाईल. ही मॅच पाहण्यासाठी सौरव गांगुली आणि जय शाह उपस्थित राहतील. कोरोनाचा BCCI ला आणखी एक फटका, क्रिकेटसाठी आयुष्य वेचणाऱ्या अधिकाऱ्याचं निधन सौरव गांगुली आणि जय शाह या दौऱ्यात आयपीएलच्या उरलेल्या 31 मॅचबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्डासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. मिडलसेक्स, सरे, वारविकशायर आणि लँकशायर काऊंटी टीमनी आयपीएलचं आयोजन करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. याशिवाय इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन यानेही आयपीएलचं इंग्लंडमध्ये आयोजन करण्यात यावं, अशी मागणी केली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: