शोध प्रशिक्षकाचा : कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील समिती अडकली वादात!

भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार विंडीज दौऱ्यापर्यंत असून बीसीसीआय़ लवकरच नवीन प्रशिक्षकांची निवड करणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2019 02:04 PM IST

शोध प्रशिक्षकाचा : कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील समिती अडकली वादात!

मुंबई, 31 जुलै : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. यासाठी अर्ज करण्याची मुदत संपली असून आता कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समिती अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेणार आहे. क्रिकेट सल्लागार समितीमध्ये कपिल देव यांच्याशिवाय माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता गंतास्वामी आहेत.

संघाच्या प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी नव्या वादाला तोंड फुटले आहे. बीसीसीआय नव्या नियमानुसार समिती प्रशिक्षकाची निवड करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. समितीमधील सदस्य इतर पदावर असल्याने निवड प्रक्रियेत अडचण येईल अशी चर्चा होत आहे.

मुलाखत घेण्यापूर्वी बीसीसीआय़चे लोकपाल डीके जैन याबाबत अंतिम निर्णय घेतील. इतर पदावरील हितसंबंधाच्या अडचणीबद्दल याआधी डायना इडुल्जी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे आजीवन सदस्य संजीव गुप्ता यांनीसुद्धा पत्र लिहून याबद्दल विचारणा केली होती.

शोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत!

कपिल देव भारतीय क्रिकेट असोसिएशनच्या समितीचे सदस्य आहेत. अंशुमन गायकवाड यांच्यासोबत टीव्हीवर विशेषज्ञ म्हणून काम पाहतात. याशिवाय गायकवाड बीसीसीआय़च्या मेंबरशी निगडीत समितीचा भाग आहेत. तर शांता रंगास्वामी आयसीएच्या संचालक आहेत.

Loading...

आफ्रिदी म्हणतो,'पागल है? गेंदबाजी कौन करेगा?'; पाहा VIDEO

सोलापूरमध्ये बँकेचा स्लॅब कोसळला, दुर्घटनेचा पहिला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 02:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...