मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /BCCI नं सुरू केली कोच निवडीची प्रक्रिया, राहुल द्रविडनं केला 'या' पदासाठी अर्ज

BCCI नं सुरू केली कोच निवडीची प्रक्रिया, राहुल द्रविडनं केला 'या' पदासाठी अर्ज

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. मागील वर्षी कोरोनामुळे (Coronavirus) या निवडी स्थगित करण्यात आल्या होत्या.

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. मागील वर्षी कोरोनामुळे (Coronavirus) या निवडी स्थगित करण्यात आल्या होत्या.

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. मागील वर्षी कोरोनामुळे (Coronavirus) या निवडी स्थगित करण्यात आल्या होत्या.

मुंबई, 23 ऑगस्ट: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (NCA) बॅटींग, बॉलिंग (फास्ट आणि स्पिन) आणि फिल्डिंग कोचच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाईटवर या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 10 सप्टेंबर असून वयोमर्यादा 60 वर्ष आहे.

राष्ट्रीय क्रिकेट अकदामीमध्ये सध्या बॅटींग कोच म्हणून ऋषिकेश कानिटर आणि शिवसुंदर दास, बॉलिंग कोच म्हणून रमेश पोवार (स्पिन), सुब्रतो बॅनर्जी (फास्ट), शिवसुंदर दास (क्रिकेट प्रशिक्षण प्रमुख), हे काम करत होते. यापैकी रमेश पोवार आणि शिवसंदुर दास हे भारतीय महिला टीमचे हेड कोच आणि बॅटींग कोच बनले आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षी ही प्रक्रिया झाली नव्हती. त्यानंतर यावर्षी ही निवड करण्यात येणार आहे.

बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वी क्रिकेट कोचसाठी आठ दिवसांच्या 2 कोर्सचं आयोजन केले होते. यामध्ये इराफन पठाण, यूसुफ पठाण, अभिषेक नायर, अशोक डिंडा, देवांग गांधी, नमन ओझा आणि परवेज रसूल सहभागी झाले होते. राष्ट्रीय क्रिकेट अकादामीच्या संचालक पदासाठी अर्ज करण्याची मुदत बीसीसीआयनं 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.

द्रविडनं केला अर्ज

एनसीएच्या संचालकपदासाठी राहुल द्रविडनं (Rahul Dravid) पुन्हा एकदा अर्ज केला आहे. द्रविडनं या संस्थेचा चेहरा बदलण्यासाठी त्यानं मोठं काम केलं आहे. त्यामुळे त्याची या पदावर पुन्हा एकदा राहण्याची इच्छा आहे. या पदासाठी द्रविडच्या शिवाय कोणत्याही मोठ्या नावानं अद्याप अर्ज केलेला नाही. त्यामुळे त्याला दोन वर्षांची मुदतवाढ मिळू शकते.

IND vs ENG: लीड्स टेस्टमध्ये जसप्रीत बुमराह करणार सर्वात वेगवान शतक!

टीम इंडियाचे कोचही बदलणार

टी 20 वर्ल्ड कपनंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या बदलाची तयारी सुरु झाली आहे. युएईमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri), बॉलिंग कोच भरत अरुण, फिल्डिंग कोच आर. श्रीधर आणि बॅटींग कोच विक्रम राठोड भारतीय टीमपासून वेगळं होण्याची शक्यता आहे. शास्त्रीनं बीसीसीआयच्या काही सदस्यांना याबाबतची सूचना दिली आहे. त्याचबरोबर अन्य कोचिंग स्टाफची देखील आयपीएल टीमबरोबर चर्चा सुरू आहे. असं वृत्त यापूर्वी प्रसिद्ध झालं आहे.

First published:
top videos

    Tags: BCCI, Cricket news, Rahul dravid