• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • मोठी बातमी: भारतीय क्रिकेटपटूंना दिलासा, BCCI नं जाहीर केली भक्कम पगारवाढ!

मोठी बातमी: भारतीय क्रिकेटपटूंना दिलासा, BCCI नं जाहीर केली भक्कम पगारवाढ!

बीसीसीआयच्या (BCCI) सर्वोच्च कौन्सिलची बैठक सोमवारी झाली. या बैठकीत खेळाडूंच्या मॅच फिसमध्ये वाढ करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी ही माहिती दिली आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 सप्टेंबर : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) गेल्या दोन वर्षांपासून जग विस्कळीत झालं आहे. क्रिकेट विश्वालाही याचा मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे मागील वर्षातील बराच काळ क्रिकेट बंद होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु झाले. पण देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा होऊ शकली नव्हती. रणजी ट्रॉफी स्पर्धेचा (Ranji Trophy) मागील सिझन देखील स्थगित करण्यात आला होता. देशांतर्गत क्रिकेट बंद असल्यानं त्यावर उपजिवेकेसाठी अवलंबून असणाऱ्या क्रिकेटपटूंना अडचणीचा सामना करावा लागत होता. या क्रिकेटपटूंना बीसीसीआयनं दिलासा दिला आहे. या खेळाडूंची बहुप्रतिक्षित पगारवाढ बीसीसीआयनं जाहीर केली आहे. बीसीसीआयच्या सर्वोच्च कौन्सिलची बैठक सोमवारी झाली. या बैठकीत खेळाडूंच्या मॅच फिसमध्ये वाढ करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी ही माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या नव्या वेतनपद्धतीनुसार 40 पेक्षा जास्त मॅच खेळलेल्या खेळाडूंना 60 हजार रूपये, 23 वर्षांखालील क्रिकेटपटूंना 25 हजार तर 19 वर्षांच्या खालील क्रिकेटपटूंना 20 हजार रुपये मॅच फिस देण्यात येणार असल्याची घोषणा जय शहा यांनी केली आहे. त्याचबरोबर जे क्रिकेटपटू 2019-20 साली झालेल्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांना 2020-21 चा सिझन रद्द झाल्यानं नुकसान भरपाई म्हणून 50 टक्के मॅच फिस देण्यात येणार असल्याचं जय शहा यांनी जाहीर केलं.
  मृत्यूच्या दारातून परतला दिग्गज क्रिकेटपटू, VIDEO शेअर करत म्हणाला... 'खेळाडूंना किमान 50 टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी असं बीसीसीआयच्या बहुतेक सदस्यांचं मत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शहा (Jay Shah) घेणार होते. बीसीसीआयच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अखेर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
  Published by:News18 Desk
  First published: