मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL आधी भारतात होणार 'ही' मोठी स्पर्धा, BCCI नं जाहीर केल्या तारखा

IPL आधी भारतात होणार 'ही' मोठी स्पर्धा, BCCI नं जाहीर केल्या तारखा

आयपीएलपूर्वी (IPL) भारतात कोणती देशांतर्गत स्पर्धा होणार? या विषयावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.

आयपीएलपूर्वी (IPL) भारतात कोणती देशांतर्गत स्पर्धा होणार? या विषयावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.

आयपीएलपूर्वी (IPL) भारतात कोणती देशांतर्गत स्पर्धा होणार? या विषयावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 14 डिसेंबर:  कोरोना व्हायरस (coronavirus) मुळे भारतात या वर्षभरात फारसं क्रिकेट होऊ शकलं नाही. इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा सुरुवातीला पुढे ढकलण्यात आली आणि नंतर यूएईमध्ये (UAE) झाली. आता भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) मालिकेनं 2021 मध्ये भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होणार आहे. त्यानंतर आयपीएल स्पर्धा असेल. आयपीएलपूर्वी भारतात कोणती देशांतर्गत स्पर्धा होणार? या विषयावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.

'बायो बबल'मध्ये स्पर्धा

बीसीसीआयनं (BCCI) देशांतर्गत क्रिकेटची सुरुवात सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेनं (Syed Mushtaq Ali Trophy) करण्याची घोषणा केली आहे. 10 ते 31 जानेवारीच्या दरम्यान सहा राज्यांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू तसंच टीम मॅनेजमेंटच्या सदस्यांसाठी बायो बबलमध्ये (Bio Bubble) खेळवली जाणार आहे. सर्व टीम्सना दोन जानेवारी रोजी त्यांच्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या बायो बबलमध्ये दाखल व्हावे लागेल.

हे वाचा-ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्यावर येणार बायोपिक; लवकरच शूटिंगला सुरुवात

रणजी ट्रॉफीबाबत संभ्रम कायम

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सर्व राज्यांच्या संघटनांना ई मेल लिहिला असून त्यामध्ये मुश्तात अली स्पर्धेच्या तारखांची माहिती दिली आहे. मात्र देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मानाची समजली जाणारी रणजी ट्रॉफी स्पर्धा कधी सुरु होणार याबाबत अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.मुश्ताक अली स्पर्धेमधील साखळी सामने संपल्यानंतर रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी सर्व सदस्य संघटनांचं मत विचारात घेतलं जाईल असंही शहा यांनी स्पष्ट केले आहे.

मुश्ताक अली स्पर्धेला प्राधान्य का?

मुश्ताक अली ही बीसीसीआयकडून देशांतर्गत पातळीवर घेतली जाणारी टी 20 स्पर्धा आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडूंचं ऑक्शन फेब्रुवारीत होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये नऊ किंवा 10 टीम खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएल ऑक्शनपूर्वी सर्व खेळाडूंना टी 20 स्पर्धेचा सराव व्हावा म्हणून बीसीसीआयनं मुश्ताक अली स्पर्धेला प्राधान्य दिल्याची शक्यता आहे.

First published:

Tags: BCCI, Cricket