मँचेस्टर, 12 जुलै : वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत अव्वल राहिलेल्या भारताला सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. या पराभवाने निराश झाल्यानंतर संघासह व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संघ व्यवस्थापनाने त्यांची जबाबदारी नीट पार पाडली नसल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान भारतीय संघातील सदस्यांवर बेजबाबदारपणामुळे बीसीसीआय नाराज असल्याचं म्हटलं जात आहे.
भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर भारतीय संघ आणि प्रशिक्षकांवर टीका केली जात होती. मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांचा कार्यकाळ वर्ल्ड कप पर्यंतच होता. मात्र, त्यांना 45 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यातच आणखी एका प्रशिक्षकांचे काय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
भारताचे सहायक प्रशिक्षक संजय बांगर यांनी त्यांची जबाबदारी नीट पार पाडली नाही असं बीसीसीआयमधल्या काही लोकांना वाटतं. ते आणखी चांगलं काम करू शकले असते. गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. तर फिल्डिंग कोच आर श्रीधरन यांनी क्षेत्ररक्षणात सुधारणा केल्या. मात्र भारताच्या बलाढ्य फलंदाजीवर प्रश्न निर्माण झाले आहेत. यातही चौथ्या क्रमांकाचा प्रश्न गेल्या चार वर्षांपासून वारंवार पुढे येत आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी IANS शी बोलताना सांगितले की, मधल्या फळीत सलग प्रयोग केल्यानं संघाला खूप नुकसान झालं. फक्त वर्ल्ड कपमध्येच नाही तर गेल्या काही मालिकांमध्येही अशीच परिस्थिती होती. संजय बांगर यावर कोणताही उपाय शोधू शकले नाहीत. त्यांनी चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकर फिट असल्याचं म्हटलं मात्र तो दुखापतीने वर्ल्ड कपमधून बाहेर गेला. हीच गोष्ट खटकणारी असल्याचं त्या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. यामुळे कदाचित बांगर यांची सुट्टी होऊ शकते.
फक्त धोनीच नाही भारताच्या निम्म्या संघासाठी हा शेवटचा वर्ल्ड कप?
भारताला पराभव पत्करावा लागला असला तरी आम्ही खेळाडूंसोबत आहोत. त्यांनी सेमीफायनल वगळता संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन केलं आहे. भविष्यात सपोर्ट स्टाफबद्दल विचार करताना त्यांच्या निर्णयातून काय निष्पन्न झालं हे बघितलं जाईल असं त्या अधिकाऱ्याने सांगितलं.
'चौथ्या क्रमांकावर 'हा' मुंबईकर खेळाडूच होता योग्य, निवड समितीचा निर्णय चुकला'!
संघाच्या व्यवस्थापकांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांचे काम मित्रांना तिकिट आणि पास देण्याचंच राहिल्याचं म्हटलं जात आहे. त्यांची जबाबदारी त्यांनी प्राधान्यक्रमाने घेतली नसल्याचं बीसीसीसआयच्या अधिकाऱ्याने म्हटलं.
VIDEO : RSSच्या शाखेत दोन गटात तुफान हाणामारी