बीसीसीआय आता माहितीच्या अधिकारात !

बीसीसीआय आता माहितीच्या अधिकारात !

  • Share this:

नवी दिल्ली, 1 आॅक्टोबर : केंद्रीय सुचना आयोग (CIC) ने भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड अर्थात बीसीसीआयला माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती देण्याचे आदेश दिले आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत आल्यामुळे बीसीसीआयला देशाला माहिती देणे आता बंधनकारक राहणार आहे.

आरटीआय प्रकरणी सीआईसीने कायदा, सुप्रीम कोर्टाचे आदेश आणि विधी आयोगाचा अहवाल आणि क्रीडा मंत्रालयाच्या केंद्रीय सुचना अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढलाय. बीसीसीआयची स्थिती, प्रकृती आणि काम करण्याची पद्धत माहितीच्या अंतर्गत कलम 2 (H) नियमात येत आहे.

सुचना आयुक्त श्रीधर आचार्युलू यांनी आपल्या 37 पानी अहवालात स्पष्ट केलंय की, सुप्रीम कोर्टाने पुन्हा स्पष्ट केलंय की, बीसीसीआय देशात क्रिक्रेट स्पर्धा आयोजित करणारी स्वीकृत राष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे. ज्याचा एक अधिकार आहे.

आचार्युलू यांनी कायद्यानुसार, गरजेच्या केंद्रीय लोक सुचना अधिकारी, केंद्रीय सहायक सार्वजनिक सुचना अधिकारी आणि प्रथम अपील अधिकारी म्हणून योग्य अधिकारी नियुक्त करण्यासाठी अध्यक्ष, सचिव आणि प्रशासकीय समितीला आदेश दिले आहे.

तसंच बीसीसीआयला माहितीच्या अधिकारासाठी 15 दिवसांमध्ये आॅनलाईन आणि आॅफलाईन माहिती मागवण्यासाठी सुविधा तयार करण्याची सुचनाही दिलीये.

क्रीडा मंत्रालयाने आरटीआय कार्यकर्ता गीता रानी यांना समाधानधारक उत्तर दिली नव्हती. त्यानंतर त्यांनी याबद्दल माहिती मागितली होती. त्यात बीसीआय भारतात खेळाडूंची निवड करणारी संस्था असल्याचं समोर आलं होतं.

बीसीसीआयला माहिती अधिकाराच्या अंतर्गत राष्ट्रीय खेळ महासंग (NSF) नुसार असलं पाहिजे. आरटीआय अधिनियम बीसीआय आणि त्याच्या संवैधानिक सदस्य क्रिकेट संघासाठी लागू केले पाहिजे.

==========================================

लष्कराची बुलेटवर चित्तथरारक प्रात्यक्षिकं, पाहून थक्क व्हाल : VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2018 09:51 PM IST

ताज्या बातम्या