INDvsWI : विंडीज दौरा कठीण? 'हा' अष्टपैलू खेळाडू संघात नाही

INDvsWI : विंडीज दौरा कठीण? 'हा' अष्टपैलू खेळाडू संघात नाही

वेस्ट इंडीज दौऱ्यातून महेंद्रसिंग धोनीने माघार घेतली आहे. तसेच अष्टपैलू खेळाडू हार्दीक पांड्यासुद्धा या दौऱ्यात खेळणार नाही.

  • Share this:

मुंबई, 21 जुलै : वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमधून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताच्या तीनही प्रकारातील संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे असणार आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संघ जाहीर करण्यात आला. यामध्ये मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. त्याशिवाय यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने दौऱ्यातून माघार घेतली आहे. दिनेश कार्तिकला वगळण्यात आले असून कसोटी संघात त्याच्या जागी वृद्धीमान साहाची वर्णी लागली आहे.

शिखर धवन फिट झाला असून त्याचं संघात पुनरागमन झालं आहे. वर्ल्ड कपदरम्यान विजय शंकरला दुखापत झाली होती. त्याच्याशिवाय पृथ्वी शॉसुद्धा दुखापतीमुळे बाहेर आहे. तर हार्दिक पांड्यासुद्धा पाठदुखीमुळे वेस्ट इंडीज दौऱ्यात खेळू शकणार नाही.

धोनी वेस्ट इंडिज दौऱ्याला मुकणार

वेस्ट इंडीज दौऱ्यावर धोनी संघात नसेल. तो यापासून दूर राहणार असला तरी संघात होणाऱ्या बदलासाठी तो मदत करणार आहे. पुढच्या काळातही भारताच्या संघात धोनी 15 जणांमध्ये असेल पण तो अंतिम अकरामध्ये नसेल. त्याच्या जागी ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून संघात खेळणार आहे.

सैनी-अहमद यांना संधी

जसप्रीत बुमराहला विश्रांती दिल्यामुळे संघात नवदीप सैनीला संधी मिळाली आहे. त्याशिवाय खलील अहमद यालाही स्थान देण्यात आलं आहे.

एकदिवसीय संघ : रोहित शर्मा, सिखर धवन, विराट कोहली(कर्णधार) केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी

टी20 संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार) केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी

कसोटी संघ : मयंक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, अश्विन, जडेजा, कुलदीप यादव इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव

भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौऱा 3 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 टी-20 सामने, 3 वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. त्यानंतर 8 ऑगस्टपासून वनडे तर 22 ऑगस्टला पहिला कसोटी सामना सुरू होईल.

INDvsWI : कार्तिकला वगळले, त्याच्या जागी 'या' खेळाडूची वर्णी

World Cup च्या संघातून रायडुला का वगळले? निवड समितीच्या प्रमुखांनी केला खुलासा

VIDEO: पाकिस्तानमधील रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, 9 जणांचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2019 04:35 PM IST

ताज्या बातम्या