कोलकाता, 4 डिसेंबर: टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचे (Sourav Ganguly) क्लासिक ऑफ ड्राईव्ह शुक्रवारी पाहयला मिळाले. बीसीसीआयची सर्वसाधारण सभा शनिवारी होणार आहे. या बैठकीच्या आदल्या दिवशी इडन गार्डन्सवर 15-15 ओव्हर्सची प्रदर्शनीय मॅच झाली. शेवटपर्यंत रंगलेल्या या मॅचमध्ये बीसीसीय अध्यक्षांच्या टीमचा जय शहा (Jay Shah) यांच्या कॅप्टनसीखालील सचिवांच्या टीमनी फक्त 1 रननं पराभव केला.
सौरव गांगुली या मॅचमध्ये सहाव्या क्रमांकावर उतरले. त्यांनी 20 बॉलमध्ये 2 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 35 रन काढले. त्यानंतर त्यांना नियमाप्रमाणे रिटायर व्हावं लागलं. गांगुली रिटायर झाल्याचा फटका त्यांच्या टीमला बसला. दादाच्या होम ग्राऊंडवर जय शहा यांनी स्पिन बॉलिंगनं कमाल केली. त्यांनी 7 ओव्हर्समध्ये 58 रन देत 3 विकेट्स घेतल्या. त्यांच्या बॉलिंगमुळेच शहा यांच्या टीमला 128 रनचा बचाव करता आला.
And finally, @SGanguly99 walks in to bat replacing @CabCricket President Avishek Dalmia pic.twitter.com/TCsuRvnHoK
— Yash Chawla (@chawla_yash) December 3, 2021
माजी कॅप्टनची घेतली विकेट
जय शहा यांनी टीम इंडियाचा माजी कॅप्टन मोहम्मद अझहरूद्दीनला 2 रनवर आऊट करत गांगुलीच्या टीमला धक्का मोठा धक्का दिला. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या सूरज लोटलिकर यांना तर त्यांनी शून्यावर आऊट केलं. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांना 13 रनवर आऊट करत त्यांनी तिसरी विकेट घेतली. सहाव्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या गांगुली यांनी चांगली फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी 2 बॉलवर बाहेर येत ऑफ साईडला टोलेबाजी केली .
टीम इंडियासाठी दुर्लक्ष झालेल्या खेळाडूची आफ्रिकेत कमाल, निवड समितीला चोख उत्तर
त्यापूर्वी बीसीसीआय सचिवांच्या टीमकडून अरुण धूमल (36) आणि जयदेव शाह (40) यांनी 92 रनची पार्टनरशिप करत निर्धारित ओव्हर्समध्ये 3 आऊट 128 रन केले. जय शहा 10 रन काढून नाबाद राहिले. बीसीसीआय अध्यक्षांच्या टीमकडून गांगुली यांनी 1 विकेट घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket, Sourav ganguly