हे फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. क्रिकेटसाठी असणारे तिचे प्रेम पाहून आनंद झाल्याचे एकाने म्हटले आहे. तर एकाने तिला भावी वैवाहिकआयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारचे हे काही पहिलेच हटके फोटोशूट नाही. काहीच दिवसांपूर्वी केरळमधील एका कपलचेही असेच फोटो समोर आले होते. त्यानंतर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेल होते. दरम्यान, 24 वर्षीय इस्लामने 2014 मध्ये बांग्लादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत तिने बांगलादेशसाठी 14 वनडे आणि 32 टी -20 सामने खेळले आहेत. 2018 मध्ये बांग्लादेशने जिंकलेल्या आशिया कपमधील टीममध्ये तिचा समावेश होता. 2019 मध्ये तिने पाकिस्तानविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.