शाकीब अल हसनने मागितली माफी, काली मातेच्या पुजेनंतर मिळाली होती धमकी

शाकीब अल हसनने मागितली माफी, काली मातेच्या पुजेनंतर मिळाली होती धमकी

बांगलादेशचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याने माफी मागितली आहे.

  • Share this:

ढाका, 17 नोव्हेंबर : बांगलादेशचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याने माफी मागितली आहे. शाकीब अल हसन गुरुवारी भारतात बेलघाटमध्ये काली मातेजी पूजा करण्यासाठी आला होता, यानंतर तो शुक्रवारी पुन्हा बांगलादेशला परतला. यानंतर एका व्यक्तीने शाकीबला फेसबूक लाईव्ह करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

भारतात हिंदू देवीच्या पुजेसाठी गेल्यानंतर मुस्लिम बहुसंख्य देश असलेल्या बांगलादेशमध्ये शाकीबवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. नागरिकांनी इतर धर्माच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होता कामा नये, अशा प्रतिक्रिया बांगलादेशमधल्या इस्लामी प्रचारकांनी दिल्या होत्या, यानंतर हा वाद वाढला होता.

बांगलादेशमधून वाढता विरोध बघता सोमवारी रात्री उशिरा शाकीब अल हसनने माफी मागितली. 'मी त्या कार्यक्रमात फक्त दोन मिनिटं होतो. लोकांना मी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, असं वाटत आहे. मी असं काहीही केलं नाही. एक जागरुक मुस्लिम म्हणून मी असं काहीही करणार नाही, पण मला तिकडे जाणं टाळायला पाहिजे होतं. यासाठी मी सगळ्यांची माफी मागतो. मुस्लिम असल्यामुळे मी नेहमीच धार्मिक रिती रिवाजांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. जर मी काही चूक केली, असेल तर मला माफ करा,' असं शाकीब म्हणाला.

सिलहटच्या शाहपूर तालुकदरमध्ये राहणाऱ्या मोहसिन तालुकदर नावाच्या व्यक्तीने रविवारी फेसबूक लाईव्ह करून शाकीबला धमकी दिली. शाकीबचं वागणं मुस्लिमांना त्रास देणारं आहे, आपण शाकीबचे तुकडे-तुकडे करू, शाकीबला मारण्यासाठी आपण सिलहटवरून ढाक्याला जाऊ, असं या युवक फेसबूक लाईव्हमध्ये म्हणाला. फेसबूक लाईव्ह करताना या युवकाच्या हातात तलवारही होती.

या व्हिडिओबाबत माहिती मिळाल्यानंतर सिलहट पोलिसांनी व्हिडिओची लिंक सायबर फॉरेन्सिक टीमला पाठवली. लवकरच या व्यक्तीवर कारवाई करू, असं अतिरिक्त पोलीस आयुक्त बीएम अशरफ उल्लाह तहर यांनी सांगितलं. यानंतर धमकी देणाऱ्या तरुणानेही माफी मागितली. तसंच शाकीबसह सगळ्याच सेलिब्रिटींनी योग्य मार्गाने जाण्याचा सल्लाही त्याने दिला, तसंच आपण फेसबूकवरुन ते दोन्ही व्हिडिओ हटवल्याचंही तरुण म्हणाला.

Published by: Shreyas
First published: November 17, 2020, 5:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading