Home /News /sport /

एकाच बॉलवर 2 विकेट...विचित्र पद्धतीनं रनआऊट झाला रसेल, पाहा VIDEO

एकाच बॉलवर 2 विकेट...विचित्र पद्धतीनं रनआऊट झाला रसेल, पाहा VIDEO

बांगलादेश प्रीमियर लीग (BPL 2022) स्पर्धेला सुरूवात झाली आहे. शुक्रवारी या लीगमधील दोन सामने झाले. यामधील दुसऱ्या सामन्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. याचे कारण एक रन आऊट आहे

    मुंबई, 22 जानेवारी : बांगलादेश प्रीमियर लीग (BPL 2022) स्पर्धेला सुरूवात झाली आहे. शुक्रवारी या लीगमधील दोन सामने झाले. यामधील दुसऱ्या सामन्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. याचे कारण एक रन आऊट आहे. कदाचित क्रिकेटच्या मैदानावर या पद्धतीचे रनआऊट कुणी पाहिले नसेल. वेस्ट इंडिजचा दिग्गज ऑल राऊंडर आंद्रे रसेल यावेळी विचित्र पद्धतीनं (Andre Russell Bizarre Run Out) रन आऊट झाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बांगलादेश प्रीमियर लीगमधील दुसरा सामना मिनिस्टर ग्रुप ढाका आणि खुलाना टायगर्समध्ये झाला. आंद्रे रसेल या लीगमध्ये मिनिस्टर ग्रुप ढाका (MGD) टीमचा सदस्य आहे. क्रिकेट फॅन्सना त्याच्याकडून फटकेबाजीची अपेक्षा होती. रसेल बॅटनं धमाल करण्यापूर्वीच विचित्र पद्धतीने रन आऊट झाला. या सामन्यात रसेलच्या टीमची पहिल्यांदा बॅटींग होती. स्वत: रसेल 15 ओव्हरमध्ये बॅटींगला आला. ही ओव्हर खुलाना टायगर्सकडून थिसारा परेरा टाकत होता. रसेलनं या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर जोरदार सिक्स लगावत सुरूवात केली होती. टीमला रसेलकडून मोठी अपेक्षा होती. पण, त्यानंतर पुढच्या बॉलवर घडलं त्याची अपेक्षा कुणीही केली नसेल. IND vs SA : आफ्रिकेच्या कॅप्टनचा टीम इंडियावर निशाणा, सीरिज जिंकल्यानंतर लगावला टोला परेरानं टाकलेला बॉल रसेलनं शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेनं टोलावला. रसेल रन काढावा की नाही हा विचार करत होता. त्याचवेळी दुसऱ्या बाजूनं खेळत असलेला कॅप्टन मेहमुदुल्लाहनं त्याला रन काढण्यासाठी कॉल केला. त्याला रसेलनंही प्रतिसाद दिला. शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डिंग करत असलेल्या मेहंदी हसननं स्ट्राईकरच्या दिशेनं स्टंपला थेट थ्रो केला. हसननं फेकलेला बॉल स्ट्राईकर्सच्या एंडला असलेल्या स्टंपला लागून नॉन स्ट्रायकर ए़ंडच्या स्टंपला धडकला. रसेलला या पद्धतीने काही घडेल याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे तो संथ गतीनं क्रिजकडे जात होता. त्याने बॅट टेकवेपर्यंत बॉल स्टंपला लागला होता. ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण, एकाच बॉलवर दोन वेळा विकेट पडली होती आणि रसेलला रन आऊट होऊन डग आऊटमध्ये परतावे लागले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Video viral

    पुढील बातम्या