Home /News /sport /

विचित्र पद्धतीनं आऊट झाला बांगलादेशचा बॅट्समन, Video पाहून आवरणार नाही हसू

विचित्र पद्धतीनं आऊट झाला बांगलादेशचा बॅट्समन, Video पाहून आवरणार नाही हसू

बांगलादेशचा बॅट्समन ताइजूल इस्लाम ( (Taijul Islam) विचित्र पद्धतीनं आऊट झाला. क्रिकेट विश्वात यापूर्वी अशा पद्धतीनं फार क्वचित कुणी आऊट झालं असेल.

  कोलंबो, 5 मे : श्रीलंकेनं ( Sri Lanka) दुसऱ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये बांगलादेशला 209 रननं हरवलं. याबरोबर  त्यांनी टेस्ट मालिका देखील जिंकली. श्रीलंकेनं पहिली इनिंग 9 आऊट 493 रनवर घोषित केली होती. त्यानंतर बांगलादेशची टीम पहिली इनिंग 251 रनवरच संपुष्टात आली. श्रीलंकेनं दुसऱ्या इनिंगमध्ये 9 आऊट 194 रन केले. त्याला उत्तर देताना बांगलादेशची दुसरी इनिंग 227 रनवर 'ऑल आऊट' झाली. या मॅचमध्ये बांगलादेशचा बॅट्समन ताइजूल इस्लाम ( (Taijul Islam) विचित्र पद्धतीनं आऊट झाला. क्रिकेट विश्वात यापूर्वी अशा पद्धतीनं फार क्वचित कुणी आऊट झालं असेल. ताइजुल पहिल्या इनिंगमध्ये सुरंगा लकमलचा बॉल बॅकफूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याचा बूट स्टंपला लागला आणि तो हिट विकेट आऊट झाला.
  View this post on Instagram

  A post shared by Fox Cricket (@foxcricket)

  महेंद्रसिंह धोनीचं 'डॅडी Cool' रुप, लेकीसोबतचे गोड Photo Viral ताइजूल या पद्धतीनं आऊट झालेलं पाहूनं सर्वजणच आश्चर्य चकीत झाले. या मॅचची कॉमेंट्री करणाऱ्या कॉमेंट्रेटर्सना देखील हसू आवरलं नाही. सुरंगा टेस्ट क्रिकेटमध्ये हिट विकेट विकेट घेणारा दुसरा श्रीलंकन बॉलर बनला आहे. यापूर्वी श्रीलंकेचा महान ऑफ स्पिनर मुरलीधरन यानं हिट 1997 साली या पद्धतीनं विकेट घेतली होती. ताइजूलनं 50 बॉलमध्ये 9 रन काढले.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bangladesh cricket team, Cricket, Sri lanka

  पुढील बातम्या