Home /News /sport /

क्रिकेट लीगमध्ये राडा! पोलीस आणि कर्मचाऱ्यांच्या संघर्षात अधिकारी जखमी

क्रिकेट लीगमध्ये राडा! पोलीस आणि कर्मचाऱ्यांच्या संघर्षात अधिकारी जखमी

शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) याने अंपायर समोर स्टंप उखाडल्याने ही स्पर्धा चर्चेत आली. हा वाद कमी होईपर्यंत आणखी एका कारणामुळे स्पर्धेला गालबोट लागलं आहे.

    ढाका, 13 जून: ढाका प्रीमियर लीग (DPL 2021) स्पर्धा सध्या सातत्यानं वादग्रस्त होत आहे. बांगलादेशचा ऑल राऊंडर शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) याने अंपायर समोर स्टंप उखाडल्याने ही स्पर्धा चर्चेत आली. हा वाद शांत होण्याच्या आत आणखी एका कारणामुळे स्पर्धेला गालबोट लागलं आहे. या स्पर्धेतील अधिकाऱ्यांवर कामगारांनी हल्ला केला आहे. कापड मजूर आणि पोलिसांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शैफुद्दीन अब्दुल्ला, अल मोतीन, तनवीर अहमद, इमरान परवेज, सोहराब हुसेन, बराकतुल्लाह तुर्की, आदिल अहमद आणि देवब्रत पॉल हे आठ अधिकारी जखमी झाले आहेत. या हल्ल्यात त्यांच्या कारचं मोठं नुकसान झालं. या अधिकाऱ्यांना जवळपास 20 मिनिटे अडवून ठेवण्यात आले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. उशीरा सुरू झाली मॅच या घटनेनंतर अंपायर आणि रेफ्री मॅचच्या ठिकाणी पोहचले. त्यामुळे मॅच अर्धा तास मॅच उशीरा सुरू झाली.  या सर्व सामनाअधिकाऱ्यांनी मोठं धाडस दाखवलं अशी माहिती ढाका मेट्रोपोलीस क्रिकेट कमिटीचे संचालक काझी अहमद यांनी दिली. या सर्व प्रकरणामुळे सकाळी 9.30 वाजता मॅच सुरू झाली. शाकीबवर कारवाई यापूर्वी या स्पर्धेतील प्रमुख खेळाडू शाकीब अल हसनवर (Shakib Al Hasan) बांगलादेश क्रिकेट बोर्डाने कारवाई केली. ढाका प्रिमीयर लीगमध्ये (DPL) अंपायरसोबत गैरवर्तन करणं शाकीबला चांगलंच महागात पडलं आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) त्याला तीन सामन्यांसाठी निलंबित केलं आहे, याचसोबत त्याला 5 लाख टाका म्हणजेच जवळपास 4.2 लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. 'हा' खेळाडू लवकरच IPL आणि भारतीय टीमचा कॅप्टन होईल, कोचचा मोठा दावा शुक्रवारी झालेल्या सामन्यात शाकीबने सगळ्या मर्यादा ओलांडल्या आणि अंपायरसमोरच दोन वेळा स्टम्प उखडले आणि फेकून दिले. याचसोबत त्याने विरुद्ध टीमचे प्रशिक्षक खालीद महमूद (Khalid Mahamood) यांच्यासोबतही वाद घातला. खालीद महमूद हे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचालकही आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bangladesh cricket team, Cricket news

    पुढील बातम्या