मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

18 वर्षाच्या युवा क्रिकेटरचा विक्रम! 42 बॉलमध्ये शतक,षटकार आणि चौकारांमध्येच काढले 78 रन

18 वर्षाच्या युवा क्रिकेटरचा विक्रम! 42 बॉलमध्ये शतक,षटकार आणि चौकारांमध्येच काढले 78 रन

बांगलादेशमध्ये सध्या वंगबंधू टी 20 कप (Bangabandhu T20 Cup) सुरु आहे. या स्पर्धेतला 15 वा सामना मोठा खास होता. या सामन्यात परवेज हुसेन इमॉन (Parvez Hossain Emon) या अठरा वर्षाच्या मुलाने फक्त 42 बॉलमध्ये शतक ठोकले.

  • Published by:  News18 Desk

ढाका, 10 डिसेंबर:  टी 20 (T20) क्रिकेट सुरु झाल्यापासून मैदानात रन्सचा पाऊस पडणे हे आता नवीन राहिलेलं नाही. एखादा बॅट्समन एक विक्रम करतो आणि दुसरा काही मॅचमध्येच तो विक्रम सहज मोडतो असे प्रकार आता वारंवार घडत आहेत. बांगलादेश (Bangladesh) मधील एका मॅचमध्ये रन्सची त्सुनामी आली होती. ही त्सुमामी घेऊन येणारा कुणी दिग्गज किंवा अनुभवी बॅट्समन नव्हता, तर फक्त 18 वर्षांचा मुलगा होता. त्याच्या बॅटिंगची सध्या क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरु आहे.

बांगलादेशमध्ये सध्या वंगबंधू टी 20 कप (Bangabandhu T20 Cup) सुरु आहे. या स्पर्धेतला 15 वा सामना मोठा खास होता. या सामन्यात परवेज हुसेन इमॉन (Parvez Hossain Emon) या अठरा वर्षाच्या मुलाने फक्त 42 बॉलमध्ये शतक ठोकले.

परवेजची जोरदार इनिंग

ढाक्कामध्ये झालेल्या या मॅचमध्ये मिनिस्ट राजशाही आणि फॉर्च्यून बारिशल या दोन टीम एकमेकांच्या विरुद्ध होत्या. राजशाहीने पहिल्यांदा बॅटिंग करत 20 ओव्हर्समध्ये 221 रन्सचं टार्गेट ठेवलं. या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करता बारिशलचा कॅप्टन आणि अनुभवी खेळाडू तमिम इक्बाल 53 रन्स काढून आऊट झाला. तमिम आऊट झाल्यानं मॅच लवकर संपेल असा सर्वांचा अंदाज होता. तमिमनंतर बॅटींगला आलेल्या परवेजने हा अंदाज चुकवला.

परवेजनं फरहद रझाच्या एकाच ओव्हरमध्ये तीन सिक्स आणि एक फोर मारत आक्रमक सुरुवात केली. या आक्रमक सुरुवातीनंतर परवेजची एक्स्प्रेस सुपरफास्ट सुटली. त्याने 24 बॉलमध्येच अर्ध शतक पूर्ण केलं.

हे वाचा-रवी शास्त्रींनी ड्रिंक पार्टीत लीक केली मोठी माहिती; ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा दावा

42 बॉलमध्ये शतक

परवेजचा वेग अर्ध शतकानंतर आणखी वाढला. त्याने पुढचे 50 रन करण्यासाठी फक्त 17 बॉल घेतले. परवेजने फक्त 42 बॉलमध्ये 100 रन काढले. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 7 षटकार खेचले, म्हणजे फक्त चौकार आणि षटकाराच्या मदतीनंच त्याने एकूण 78 रन काढले. त्याच्या या खेळीमुळे बारिशलने 19 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरच मॅच जिंकली. विशेष म्हणजे परवेज शेवटपर्यंत नाबाद होता.

टी 20 मधील वेगवान शतक

आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरच्या नावावर आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध 2017 साली फक्त 36 बॉलमध्ये शतक झळकावले होते. वास्तविक टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आयपीएलमध्ये फक्त 30 बॉलमध्ये शतक झळकावलं आहे. त्यानंतर भारताच्या ऋषभ पंतचा नंबर लागतो. पंतने 32 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं.

First published:

Tags: Cricket