मैदानात राडा! सहकाऱ्यालाच मारायला धावला दिग्गज क्रिकेटपटू, पाहा VIDEO

मैदानात राडा! सहकाऱ्यालाच मारायला धावला दिग्गज क्रिकेटपटू, पाहा VIDEO

बांगाबंधू टी-20 कप (Bangabandhu t-20 Cup)मध्ये बांगलादेशचा विकेट कीपर मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) चक्क आपल्या सहकाऱ्यालाच मारायला धावला.

  • Share this:

ढाका, 15 डिसेंबर : क्रिकेटच्या मैदानात प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूंमधली भांडणं आणि बाचाबाची आपण अनेकवेळा बघितली असेल. पण बांगलादेशमधल्या टी-20 स्पर्धेत वेगळाच प्रकार घडला आहे. बांगाबंधू टी-20 कप (Bangabandhu t-20 Cup)मध्ये बांगलादेशचा विकेट कीपर मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) चक्क आपल्या सहकाऱ्यालाच मारायला धावला. या लीगच्या 20 मॅचनंतर पाचपैकी चार टीम प्ले-ऑफला क्वालिफाय झाल्या.

सोमवारी बेक्सिमको ढाका आणणि फॉर्च्युन बरिशाल यांच्यात ढाक्यामध्ये एलिमिनेटरचा सामना झाला. मुशफिकुर रहीम कर्णधार असलेल्या ढाक्याचा या मॅचमध्ये 9 रनने विजय झाला, पण या विजयापेक्षाच मुशफिकुरच्या मैदानातल्या वर्तनाचीच जास्त चर्चा सुरू आहे. मुशफिकुर त्याचा सहकारी नसुम अहमद (Nasum Ahmed) याच्यावर चांगलाच भडकला.

17व्या ओव्हरमध्ये हा सामना रोमांचक अवस्थेत पोहोचला होता. बरिशालला विजयासाठी 19 बॉलमध्ये 45 रनची गरज होती आणि त्यांच्या हातात 5 विकेट होत्या. आतिफ हुसेन चांगली बॅटिंग करत होता.

आतिफने फाईन लेगच्या दिशेने शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल हवेत गेला. यानंतर मुशफिकुर कॅच पकडण्यासाठी धावला, त्याचवेळी फाईन लेगला उभा असलेला नसुमही कॅच पकडण्यासाठी आला. मुशफिकुर आणि नसुम यांची टक्कर होता होता वाचली, पण मुशफिकुरने कॅच पकडला. कॅच पकडल्यानंतर मुशफिकुर नसुमवर संतापला आणि त्याला मारण्यासाठी गेला. अखेर टीममधल्या इतर खेळाडूंनी मुशफिकुरला शांत केलं.

या मॅचमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या ढाक्याची अवस्था 22-3 अशी झाली होती, पण मुशफिकुर रहिमने 43 रन आणि यासिर अलीने 54 रन केले, तर अकबर अलीने 9 बॉलमध्येच 21 रनची आक्रमक खेळी केली, ज्यामुळे ढाक्याने 150 रनपर्यंत मजल मारली.

या आव्हानाचा पाठलाग करताना आतिफ हुसेनने अर्धशतक केलं. पण 17 व्या ओव्हरमध्ये हुसेन आऊट झाला. यानंतर बरिशालला 20 ओव्हरमध्ये 141 रनपर्यंतच मजल मारता आली. या पराभवानंतर बरिशल स्पर्धेबाहेर गेली आहे.

Published by: Shreyas
First published: December 15, 2020, 9:22 AM IST
Tags:

ताज्या बातम्या