News18 Lokmat

चॅम्पियन्स परत येताय, चेन्नई आणि राजस्थानला आयपीएलचे दार मोकळे !

दोन वर्ष घातले बंदी अखेर संपलीये. त्यामुळे 2018 च्या आयपीएलमध्ये या दोन्ही टीम खेळणार हे निश्चित झालंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2017 11:59 PM IST

चॅम्पियन्स परत येताय, चेन्नई आणि राजस्थानला आयपीएलचे दार मोकळे !

14 जुलै : आयपीएलचा पहिला सिझन जिंकणारी राजस्थान राॅयल्स आणि दोन वेळा चॅम्पियन्स ठरलेली चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएलचा घरवापसीचा मार्ग मोकळा झालाय. दोन वर्ष घातले बंदी अखेर संपलीये. त्यामुळे 2018 च्या आयपीएलमध्ये या दोन्ही टीम खेळणार हे निश्चित झालंय.

चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान संघमालकांचा बेटिंगमध्ये सहभाग आढळल्यामुले लोढा समितीच्या शिफारशीवरून सुप्रीम कोर्टाने दोन्ही संघांवर दोन वर्षांची बंदी घातली होती. ही बंदी संपताच आज बीसीसीआयकडून दोन्ही संघांना आयपीएलचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत.

बीसीसीआयने जर खेळाडूंना परत जाण्याची मुभा दिली तर धोणी पुन्हा एकदा चेन्नईचा कॅप्टन होईल अशी शक्यता आहे. धोणी सध्या पुणे रायझिंग टीमकडून खेळत आहे. त्याच्यासोबत याबद्दल अजून चर्चा झाली नाही असं चेन्नई टीमकडून सांगण्यात आलंय.

विशेष म्हणजे, महेंद्र सिंग धोणीच्या नेतृत्त्वाखाली दोन वेळा चेन्नईने आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2017 11:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...