धक्कादायक ! कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही मॅच खेळला पाकिस्तानी क्रिकेटपटू

धक्कादायक ! कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही मॅच खेळला पाकिस्तानी क्रिकेटपटू

कोरोनासारख्या गंभीर व्हायरसबाबत पाकिस्तानमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही तो स्थानिक क्रिकेट खेळत राहिला.

  • Share this:

कराची, 4 नोव्हेंबर : कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता आयसीसी आणि क्रिकेट बोर्ड योग्य ती खबरदारी घेताना दिसत आहेत. सगळ्याच देशांचे क्रिकेट बोर्ड खेळाडूंची वारंवार कोरोना टेस्ट करत आहेत, पण कोरोनासारख्या गंभीर व्हायरसबाबत पाकिस्तानमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही तो स्थानिक क्रिकेट खेळत राहिला. बिस्मिल्लाह खान (Bismillah Khan)असं या क्रिकेटपटूचं नाव आहे. बिस्मिल्लाह खानला आता क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

ईएसपीएन क्रिकईन्फोने दिलेल्या वृत्तानुसार बलुचिस्तानचा विकेट कीपर बॅट्समन बिस्मिल्लाह खान याला कायदे आझम ट्रॉफीमध्ये दक्षिण पंजाबविरुद्ध खेळताना कोरोनाची लक्षण जाणवत होती. चौथ्या दिवसापर्यंत बिस्मिल्लाहची कोरोना टेस्ट करण्यात आली नाही, यानंतर त्याच्याऐवजी सबस्टिट्यूट अदनान अकमलने विकेट कीपिंग केलं.

बिस्मिल्लाहची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे या स्पर्धेवरच आता संकट ओढावलं आहे, कारण स्पर्धेतल्या सगळ्या 6 टीमचे खेळाडू आणि इतर सहयोगी, मॅच अधिकारी एकाच हॉटेलमध्ये थांबले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मात्र खेळाडू, सहयोगीआणि मॅच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचं सांगितलं, तसंच शुक्रवारपासून सुरु होणारा स्पर्धेचा तिसरा टप्पाही सुरू होणार असल्याचं स्पष्टीकरण बोर्डाने दिलं.

'कायदे आझम ट्रॉफी प्रथम श्रेणी स्पर्धेत भाग घेतलेल्या सगळ्या 132 खेळाडू, सहयोगी आणि मॅच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. 6 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्याच्या मॅचसाठी या सगळ्या खेळाडूंना फिट घोषित करण्यात आलं आहे,' असं प्रसिद्धी पत्रक पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने काढलं.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कायदे आझम ट्रॉफीसाठी बायो बबल बनवलं होतं. कराचीमध्ये बनवण्यात आलेल्या या बायो बबलमध्ये खेळाडूंची कोरोना टेस्ट झाल्याचा दावा करण्यात आला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेसाठी 1091 टेस्ट केल्याचा दावा केला, पण आता बिस्मिल्लाह खानच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानची नाचक्की होत आहे.

Published by: Shreyas
First published: November 4, 2020, 9:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या