S M L

स्टीवन स्मिथ आणि वॉर्नरवर एक वर्षाची बंदी, आॅस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचा निर्णय

त्याचबरोबर दोन वर्ष हे खेळाडू कप्तानपदही भुषवू शकणार नाहीत. बेनक्राॅफ्टवरही 9 महिन्यांची बंदी घातलीय. हे तीनही खेळाडू याविरोधात अपिल करू शकतात. त्यासाठी त्यांना 7 दिवसांचा अवधी दिला गेलाय.

Sonali Deshpande | Updated On: Mar 28, 2018 02:33 PM IST

स्टीवन  स्मिथ आणि वॉर्नरवर एक वर्षाची बंदी, आॅस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचा निर्णय

28 मार्च : स्टीवन स्मिथ आणि वॉर्नरवर एक वर्षाची बंदी घातली गेलीय. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं हा निर्णय घेतलाय. एक वर्ष दोघांनाही खेळता येणार नाही. त्याचबरोबर दोन वर्ष हे खेळाडू कप्तानपदही भुषवू शकणार नाहीत. बेनक्राॅफ्टवरही 9 महिन्यांची बंदी घातलीय. हे तीनही खेळाडू याविरोधात अपिल करू शकतात. त्यासाठी त्यांना 7 दिवसांचा अवधी दिला गेलाय.

केप टाऊन इथे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचं कॅमेऱ्यात स्पष्ट दिसलं. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड करणे हा तर रणनीतीचाच असल्याचे मान्य केले आहे. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा  डागाळली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2018 02:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close