मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवा पेच, बाबर आझमसह 4 क्रिकेटपटू बोर्डावर नाराज

पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवा पेच, बाबर आझमसह 4 क्रिकेटपटू बोर्डावर नाराज

पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan Cricket) नवा पेच निर्माण झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन आणि वन-डे क्रिकेटमध्ये नंबर 1 वर असलेला बॅट्समन बाबर आझम (Babar Azam) सध्या नाराज आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 11 ऑगस्ट : पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan Cricket) नवा पेच निर्माण झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन आणि वन-डे क्रिकेटमध्ये नंबर 1 वर असलेला बॅट्समन बाबर आझम (Babar Azam) सध्या नाराज आहे. आझमच्या नाराजीला पाकिस्तान टीममधील तीन वरिष्ठ खेळाडूंनी पाठिंबा दिला आहे. मोहम्मद रिझवान, हसन अली आणि शाहिन आफ्रिदी हे टीममधील वरिष्ठ खेळाडू देखील सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर  (Pakistan Cricket Board)  नाराज आहेत.

पाकिस्तान टीममधील या चारही खेळाडू त्यांना मिळणाऱ्या पगारावर नाराज आहेत. त्यांनी बोर्डाकडं पगार वाढवण्याची मागणी केली आहे, अशी माहिती 'क्रिकेट पाकिस्तान' नं दिली आहे. या चारही खेळाडूंचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ग्रेड A मध्ये समावेश केला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) 2021-22 या वर्षासाठी नवा करारपद्धती जुलै महिन्यात खेळाडूंना दिली आहे. या पद्धतीनुसार सर्व गटातील खेळाडूंना मॅच फिस समान देण्यात येणार आहे. फक्त 4 खेळाडूंचा समावेश A ग्रेडमध्ये करण्यात आला आहे. माजी कॅप्टन अझर अलीचा बी ग्रेडमध्ये तर सर्फराज अहमदचा सी ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे.मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, वहाब रियाझ या अनुभवी क्रिकेटपटूंचा या करारात समावेश करण्यात आलेला नाही.

बाबर आझमचा पगार किती?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अव्वल खेळाडूंमध्ये समावेश असलेल्या बाबर आझमचा वार्षिक पगार 64 लाख आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला (ViratKohli) बीसीसीआयकडून वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कॅप्टन जो रुटचा वार्षिक पगार तर विराटपेक्षा जास्त म्हणजे 8 कोटी 97 लाख इतका आहे. ऑस्ट्रेलियाचा मर्यादित ओव्हर्सच्या टीमचा कॅप्टन आरोन फिंच आणि टेस्ट टीमचा कॅप्टन टीम पेन यांना प्रत्येकी 4.8 कोटी वार्षिक पगार मिळतो.

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड दोन्ही टीमला ICC चा झटका, 'ती' चूक पडली महाग

दक्षिण आफ्रिका टेस्ट टीमचा कॅप्टन डीन एल्गरचा वार्षिक पगार 3.2 कोटी तर मर्यादित ओव्हर्सच्या टीमचा कॅप्टन तेंबा वावुमाचा पगार 2.5 कोटी आहे. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनला 1.77 कोटी पगार असून बोनस म्हणून 30 लाख रुपये अतिरिक्त मिळतात. इंग्लंडच्या वन-डे टीमचा कॅप्टन इयन मॉर्गनला 1.75 कोटी, वेस्ट इंडिजच्या मर्यादित ओव्हर्सचा कॅप्टन कायरन पोलार्डला 1.73 कोटी तर टेस्ट टीमचा कॅप्टन क्रेग ब्रेथवेटला 1.39 कोटी वार्षिक पगार आहे.

First published:

Tags: Cricket news, Pakistan Cricket Board