मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /PAK vs ENG: वन-डे मालिकेतील नामुश्कीनंतर पाकिस्तानचं कमबॅक, T20 मध्ये केला रेकॉर्ड

PAK vs ENG: वन-डे मालिकेतील नामुश्कीनंतर पाकिस्तानचं कमबॅक, T20 मध्ये केला रेकॉर्ड

वन-डे क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या बी टीमकडून सपेशल पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच्या टीमवर (PAK vs ENG) जोरदार टीका होत होती. या निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्ताननं टी20 क्रिकेटमध्ये कमबॅक करत नवा रेकॉर्ड केला आहे.

मुंबई, 17 जुलै :  वन-डे क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या बी टीमकडून सपेशल पराभूत झाल्यानंतर (PAK vs ENG) पाकिस्तानच्या टीमवर जोरदार टीका होत होती. या निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्ताननं टी20 क्रिकेटमध्ये कमबॅक केलं आहे. नॉटिंगहममध्ये झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात पाकिस्ताननं इंग्लंडचा 31 रननं पराभव केला. बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांची आक्रमक अर्धशतकं हे पाकिस्तानच्या विजयाचे मुख्य वैशिष्ट्य होते.

पहिल्यांदा बॅटींगला उतरलेल्या पाकिस्तानी सुरुवात आक्रमक झाली. बाबर-रिझवान जोडीनं इंग्लंडच्या बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. शेवटच्या वन-डेमध्ये 158 रनची खेळी करणाऱ्या बाबर आझमनं टी20 मध्येही तो फॉर्म कायम ठेवला. बाबरने 49 बॉलमध्ये आठ फोर आणि तीन सिक्सच्या मदतीनं 85 रन काढले. त्याने रिझवानसोबत पहिल्या विकेटसाठी 150 रनची पार्टनरशिप केली. रिझवानने 41 बॉलमध्ये 63 रन काढले. या दोघांच्या आक्रमक खेळीमुळे पाकिस्ताननं निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 आऊट 232 रन काढले. ही त्यांची टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या आहे.

आफ्रिदीची चांगली सुरुवात

मोठ्या लक्ष्यचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात खराब झाली. शाहीन आफ्रिदीनं डेव्हिड मलानला एक रनवर आऊट केले. त्यापाठोपाठ जॉन बेअरस्टोलाही आफ्रिदीनं आऊट करत इंग्लंडला बॅकफुटवर ढकललं. मोईन अलीला देखील फार कमाल करता आली नाही.

लिविंगस्टोनचं शतक व्यर्थ

इंग्लंडच्या एका बाजूने विकेट पडत असताना लिविंगस्टोननं शतक झळकावलं. त्याने 43 बॉलमध्ये सहा फोर आणि नऊ सिक्सच्या मदतीनं 103 रन काढले. त्याला इतरांनी साथ दिली नाही. त्यामुळे त्याची शतकी खेळी व्यर्थ ठरली.

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने इतिहास घडवला, धोनी-गिलख्रिस्टला टाकलं मागे

‘मॅन ऑफ द मॅच’ शाहीन आफ्रिदीनं 30 रन देऊन तीन विकेट्स घेतल्या. शादबाने 52 रन देऊन तीन तर इमाद वासीम, मोहम्मद हसनैन आणि राऊफ यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

First published:
top videos

    Tags: Cricket, England, Pakistan