Home /News /sport /

T20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीशी काय चर्चा झाली? बाबर आझमनं दिलं उत्तर

T20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीशी काय चर्चा झाली? बाबर आझमनं दिलं उत्तर

टी20वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) मॅचमध्ये टॉसच्या दरम्यान विराटशी (Virat Kohli) काय चर्चा झाली? याची सर्वांना उत्सुकता आहे. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमला (Babar Azam) तो प्रश्न विचारण्यात आला होता.

    मुंबई, 13 डिसेंबर : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील लढतीची क्रिकेट विश्वाला मोठी प्रतीक्षा असते. या वर्षी टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) ही लढत झाली. त्यामध्ये पाकिस्तानने टीम इंडियाचा 10 विकेट्सने परभव केला. त्या वर्ल्ड कप मॅचमध्ये टॉसच्या दरम्यान दोन्ही टीमच्या कॅप्टनमध्ये काय चर्चा झाली? याची सर्वांना उत्सुकता आहे. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमला (Babar Azam) या विषयावर प्रश्न विचारण्यात आला होता. समा टीव्हीनुसार टॉसच्या दरम्यान विराटशी काय चर्चा झाली असा प्रश्न बाबरला विचारण्यात आला होता. त्यावर बाबरने त्याबाबत माहिती सांगण्यास नकार दिला आहे. मी ही चर्चा जाहीर करणार नाही, असं उत्तर बाबरनं दिलं आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये 24ऑक्टोबर रोजी दुबईत ही मॅच झााली. त्यामध्ये टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटींग करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 152 रनचं टार्गेट दिले होते. पाकिस्तानने एकही विकेट न गमावता हे टार्गेट पूर्ण केले. मोहम्मद रिझवानने 79 तर बाबर आझमने 68 रन काढले होते. टीम इंडियाकडून विराट कोहलीने सर्वात जास्त 77 रनची खेळी केली होती. F1 World Title: लुईस हेमिल्टन शेवटच्या क्षणी पराभूत झाल्यानं सचिन निराश, म्हणाला... टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे आव्हान सुपर12 मध्येच संपुष्टात आले. पाकिस्तानने सलग 5 विजय मिळवत सेमी फायमलमध्ये धडक मारली. पण, त्यांना विजेतेपद जिंकता आले नाही. ऑस्ट्रेलियानं सेमी फायनलमध्ये त्यांचा पराभव केला. बाबर आझमने स्पर्धेत सर्वात जास्त 303 रन काढले. त्याने 60.60 च्या सरासरीनं 4 अर्धशतकांच्या जोरावर हे रन काढले होते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Babar azam, Cricket news, Virat kohli

    पुढील बातम्या