Home /News /sport /

ICC ODI Ranking: 1258 दिवसानंतर विराट कोहलीला धक्का, कट्टर प्रतिस्पर्ध्यानं मारली बाजी

ICC ODI Ranking: 1258 दिवसानंतर विराट कोहलीला धक्का, कट्टर प्रतिस्पर्ध्यानं मारली बाजी

वन-डे क्रिकेटमध्ये बऱ्याच दिवसांपासून मोठी खेळी न खेळल्याचा फटका टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) बसला आहे. विराटनं तब्बल 1258 दिवसांनंतर विराटचा वन-डे रँकिंगमधील (ICC ODI Ranking) पहिला क्रमांक गमावला आहे.

    दुबई, 14 एप्रिल : वन-डे क्रिकेटमध्ये बऱ्याच दिवसांपासून मोठी खेळी न खेळल्याचा फटका टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) बसला आहे. विराटनं तब्बल 1258 दिवसांनंतर विराटचा वन-डे रँकिंगमधील (ICC ODI Ranking) पहिला क्रमांक गमावला आहे. विराटचा प्रतिस्पर्धी आणि पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) आता वन-डे क्रिकेटमधील नंबर 1 बॅट्समन बनला आहे. पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Pakistan vs South Africa) यांच्यात नुकत्याच झालेल्या वन-डे मालिकेत बाबरनं चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या रँकिंगमध्ये तो नंबर 1 वर पोहचला आहे. बाबर आझमचे 865 रेटिंग पॉईंट्स असून तो आता क्रिकेट विश्वातील नंबर 1 वन-डे बॅट्समन बनला आहे. तर विराट कोहली 857 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन रोहित शर्मा 825 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा रॉस टेलर आणि ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच हे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. विराट कोहली आणि बाबर आझम या दोनच बॅट्समनचा क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात टॉप-6 मध्ये समावेश आहे. बाबर वन-डे मध्ये नंबर 1, टी20 मध्ये तिसऱ्या तर टेस्टमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. तर विराट वन-डे मध्ये दुसऱ्या, टी20मध्ये 5 व्या आणि टेस्टमध्ये देखील 5 व्या क्रमांकावर आहे. ( वाचा : मॅचच्या एक दिवस आधी दिल्लीचा बॉलर कोरोना पॉझिटिव्ह, रबाडाबरोबर केला होता 7 तासांचा प्रवास ) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये बाबर आझमनं 3 मॅचमध्ये 76 च्या सरासरीनं 228 रन काढले होते. यामध्ये एक सेंच्युरी आणि एका हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. याच मालिकेत 76 व्या वन-डे मध्ये 13 वी सेंच्युरी लगावत बाबर आझमनं एक रेकॉर्ड केला. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात 80 पेक्षा कमी वन-डे मध्ये 13 सेंच्युरी करणारा बाबर हा एकमेव बॅट्समन आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Babar azam, Cricket news, Icc, Rohit sharma, Virat kohli

    पुढील बातम्या