मुंबई, 20 मे : पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझमला (Babar Azam) त्याच्या भावामुळे टीका सहन करावी लागत आहे. बाबर त्याचा भाऊ सफीरला ट्रेनिंगसाठी लाहोरच्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये नेला होता. पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहनवाज दहनीनं तिथं त्याला बॉलिंग करत होता. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फॅन्सनी बाबरवर टीका केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानंही (PCB) या प्रकरणाची दखल घेत बाबरला नियमांची आठवण करून दिली आहे.
बाबरनं त्याचा भाऊ सफीरसोबतच्या नेट प्रॅक्टीसचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बाबर हा सफीरला मार्गदर्शन करत आहे. बाबरनं हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये भावासोबत प्रॅक्टीस करणे पीसीबीच्या गाईडलाईन्सच्या विरूद्ध आहे. या सेंटरमध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रीय टीममधील खेळाडू, फर्स्ट क्लास क्रिकेटपटू तसंच ज्युनिअर लेव्हलचे क्रिकेटपटू अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर प्रॅक्टीस करू शकतात. बाबरचा भाऊ सफीर यापैकी कोणत्याही दर्जाचं क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे याबाबतचा वाद सुरू झाला आहे.
— safeer azam (@safeerazam10) May 14, 2022
पाकिस्तानच्या कोणत्याही खेळाडूला त्याचा नातेवाईक किंवा मित्राला या सेंटरमध्ये घेऊन येण्याची परवानगी नाही. बाबरला त्याच्या चुकांची जाणीव करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर यापुढे हा प्रकार न करण्याची सूचना दिली असल्याची माहिती पीसीबीच्या सुत्रांनी दिली आहे. बाबरनं ही चूक मान्य केल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
IPL 2022, RR vs CSK : राजस्थानच्या विजयानं बदलणार 'प्ले ऑफ'चं समीकरण, राहुलचं आहे बारीक लक्ष
पाकिस्तान पुढील महिन्यात वेस्ट इंडिज विरूद्ध वन-डे मालिका खेळणार आहे, त्याची तयारी बाबरनं लाहोरमधील सेंटरमध्ये सुरू केली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया विरूद्धची वन-डे सीरिज पाकिस्ताननं जिंकली होती. पण, टेस्ट सीरिजमध्ये त्यांचा पराभव झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Babar azam, Pakistan Cricket Board