धडाकेबाज शतकासह बाबर आझमचा विक्रम, विराटला मागे टाकलं

पाकिस्तानचा क्रिकेटपटू बाबर आझम (Babar Azam) याने विक्रमाला गवसणी घातली आहे. बाबरने विराट कोहली (Virat Kohli) आणि हाशिम आमला (Hashim Amla) ला मागे टाकलं आहे.

पाकिस्तानचा क्रिकेटपटू बाबर आझम (Babar Azam) याने विक्रमाला गवसणी घातली आहे. बाबरने विराट कोहली (Virat Kohli) आणि हाशिम आमला (Hashim Amla) ला मागे टाकलं आहे.

  • Share this:
    रावळपिंडी, 3 नोव्हेंबर : पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेली तिसरी वनडे टाय झाली, अखेर सुपर ओव्हरमध्ये झिम्बाब्वेने रोमांचक विजय मिळवला. सुपर ओव्हरमध्ये पहिले बॅटिंग करताना पाकिस्तानला 3 रनच करता आले, यानंतर झिम्बाब्वेने 3 बॉलमध्येच 5 रन करुन सामना खिशात टाकला. झिम्बाब्वेने ही मॅच जिंकली असली तरी पाकिस्तानने सीरिज 2-1ने जिंकली आहे. या मॅचमध्ये बाबर आझम (Babad Azam)ने विक्रमाला गवसणी घातली. बाबर आझमने त्याच्या वनडे कारकिर्दीतलं 12वं शतक केलं. 125 बॉलमध्ये केलेल्या 125 रनच्या बाबरच्या या खेळीत 13 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 12 शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर, तर पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये मिळून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. बाबरने 75 इनिंगमध्ये 12वं शतक केलं. या यादीमध्ये क्विंटन डिकॉक पहिल्या क्रमांकावर आहे. डिकॉकने 74 वनडे इनिंगमध्ये 12 शतकं केली होती. ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू मॅग लेनिंगने वनडे क्रिकेटमध्ये 68 इनिंगमध्येच 12 शतकं केली होती. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचाच हाशिम आमला तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमलाने 81 इनिंगमध्ये 12 शतकं केली होती, तर विराट या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. विराटने पहिली 12 शतकं 82 इनिंगमध्ये केली होती. तिसऱ्या वनडेमध्ये झिम्बाब्वेने टॉस जिंकून पहिले बॅटिंग केली. झिम्बाब्वेकडून सिन विलियम्सने शानदार 118 रनची नाबाद खेळी केली. यामुळे झिम्बाब्वेने 50 ओव्हरमध्ये 278 रन केले. पाकिस्तानची टीम या आव्हानाच्या जवळ आली पण त्यांना हे आव्हान पार करता आलं नाही, त्यामुळे मॅच टाय झाली आणि सुपर ओव्हरमध्ये झिम्बाब्वेने विजय मिळवला.
    Published by:Shreyas
    First published: