मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

बाप होण्याचा आनंद! पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट

बाप होण्याचा आनंद! पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट

ऑस्ट्रेलिया आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) फास्ट बॉलर पॅट कमिन्स (Pat Cummins) लवकरच बाबा होणार आहे. त्याची गर्लफ्रेंड आणि होणारी बायको बॅकी बोस्टन (Becky Boston) हिनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सांगितली होती.

  • Published by:  News18 Desk

सिडनी, 14 मे : ऑस्ट्रेलिया आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) फास्ट बॉलर पॅट कमिन्स (Pat Cummins) लवकरच बाबा होणार आहे. त्याची गर्लफ्रेंड आणि होणारी बायको बॅकी बोस्टन (Becky Boston) हिनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सांगितली होती. भारतामध्ये यावर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या T20 वर्ल्ड कपपूर्वी कमिन्सच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन होईल. कमिन्सनं या आनंदामध्ये त्याच्या गर्लफ्रेंडला एक अत्यंत खास गिफ्ट दिलं आहे.

पॅट कमिन्सनं सिडनीमध्ये (Sydney) एक अलिशान व्हिला खरेदी केला आहे. आता लवकरच कमिन्स आणि बॅकी या घरामध्ये राहतील. या घराची किंमत 9.5 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 70 कोटी रुपये असल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिली आहे. 'पॅटनं मला हा व्हिला गिफ्ट दिला आहे,' अशी माहिती बॅकीनं सोशल मीडियावर दिली आहे.

कसं आहे घर?

'डेली मिल' नं दिलेल्या वृत्तानुसार  पॅसिफिक समुद्राच्या जवळ 670 चौरस मीटर परिसरात हा व्हिला आहे. यामध्ये पाच मास्टर बेडरुम्स असून मुलांसाठी दोन खास बेडरुम आहेत.  कमिन्स आणि बॅकीच्या  कुटुंबीयांना  एकत्र घालवण्यासाठी विशेष जागा, स्विमिंग पूल आणि मोठी लॉन देखील या बंगल्यात उपलब्ध आहे. कमिन्सनं घेतलेलं हे तिसरं घर आहे.

कमिन्स आणि बॅकीनं मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये साखरपुडा केला होता. बॅकीनं तिचा प्रेगन्सीचा फोटो शेअर केला आहे. ‘मी ही आनंदाची बातमी लपवू शकत नाही, बेबी बोस्टन कमिन्स लवकरच आपल्यासोबत असेल,’ असं तिनं सांगितलं.

डेव्हिड वॉर्नरची पत्नी कँडी वॉर्नरनं ही सनसनाटी बातमी असून दोघांचं अभिनंदन अशा शुभेच्छा दिल्या आहेत. कमिन्सनं भारतामधील कोरोनाग्रस्तांसाठी 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 37 लाख 36 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.

आयपीएल स्पर्धेच्या या सिझनमधील (IPL 2021) 7 मॅचमध्ये 9 विकेट्स घेणारा कमिन्स सध्या मालदीवमध्ये आहे. आयपीएल स्थगित झाल्यानंतर कमिन्स आणि अन्य ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदीवला गेले आहेत.  15 मे नंतर ते ऑस्ट्रेलियात परततील.

First published:

Tags: Australia, Cricket news, KKR