News18 Lokmat

झोपलेल्या महिलेवर बलात्कार, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू दोषी

क्रिकेटपटूने न्यायालयात आरोप फेटाळून लावताना म्हटले होते की, त्या महिलेला तिच्यासोबत काय होत आहे याची कल्पना होती.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 12:51 PM IST

झोपलेल्या महिलेवर बलात्कार, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू दोषी

सिडनी, 13 एप्रिल : इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये वोरसेस्टरशायरकडून खेळणाऱा ऑस्ट्रेलियन खेळाडू बलात्कार प्रकरणात दोषी आढळला आहे. अॅलेक्स हेपबर्नवर झोपलेल्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होता. 1 एप्रिल 2017 मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी वेरसेस्टर क्राउन कोर्टाने त्याला दोषी ठरवले आहे.

अॅलेक्सने सुरुवातीला महिलेवर बलात्काराचा आरोप फेटाळून लावला होता. तसेच, त्याने आपली बाजू मांडताना म्हटले होते की, त्या महिलेला तिच्यासोबत काय होत आहे याची कल्पना होती. याप्रकरणी कोर्टात 10 तास 53 मिनिटे युक्तिवाद झाला. दोन्ही पक्षाची बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने अॅलेक्सला बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवले.

पीडित महिलेने न्यायालयात म्हटले की, तिला माहिती नव्हते की तिच्यासोबत अॅलेक्स आहे. जेव्हा त्याने मला स्पर्श केला तेव्हा समजले की तो क्लार्क नसून अॅलेक्स आहे. त्यावेळी क्लार्क कुठे आहे असंही अॅलेक्सला विचारलं. मात्र, अॅलेक्सने तिच्या सौंदर्याचे कौतुक करत शारीरिक संबंधासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा त्याला नकार दिल्यानंतरही जबरदस्तीने संबंध ठेवले.

वेस्टर्न ऑस्ट्रेलियात जन्मलेला अॅलेक्स हेपबर्न क्रिकेटच्या करिअरसाठी 2013 मध्ये इंग्लंडला आला होता. मात्र, या प्रकरणानंतर त्याचे क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे स्वप्न होते.

मोदींची 'मन की बात' हिटलरची काॅपी, राज ठाकरेंचं UNCUT भाषण

Loading...बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 12:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...